रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य वतीने केंद्र सरकारच्या विरोधात दर्शविला निषेध

    105

    ?शेतकरी विरोधी कायदा रद्द न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन – सुनील ठोसर प्रदेश सरचिटणीस

    ✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114/9404223100

    गेवराई(दि.8डिसेंबर):-नव्या कृषीकायद्याच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला गेवराई शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यवहार सकाळपासून कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. रयत शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावे असे तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले. भारत बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास व्यापार्यांनी उत्स्फूर्त दिला अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार सकाळपासून पूर्ण बंद होते. शेतकरी बांधवांच्या माल अडत्याला देऊन आजपर्यंत अनेक बाजार समितीच्या माध्यमातून फसविले जात आहेत याला व मिळकतीचा मोबदला मिळावा म्हणून कोर्टात याचिका दाखल करता येणार नाही यासह अनेक शेतकरी विरोधी कायदा केंद्र सरकारने परित केले.

    या विषयी कुठलीही माहिती शेतकरी बांधवांना न देता केंद्राचे सदस्य असणारे खाजदार हे विधेयकाला मंजुरी देऊन गप्प बसले व हा विषय पंजाब व हरियाणा राज्यातील शेतकरी बांधवांना लक्ष्यात आलं या आंदोलनाची दिशा मिळाली तर देशातील शेतकरी व शेतमजूर, संघटना यात सहभागी झाले यातच रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य अड रवीप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर सह सर्व विभागातील विभाग प्रमुख तथा राज्यातील सर्व पदाधिकारी यांच्या वतीने अनेक ठिकाणी जाऊन केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शनं व रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

    केंद्र सरकारने शेतकरी विरोधी विधेयक मंजूर केले तसे रद्द न करता राज्यात एखादा खाजदार व केंद्रीय मंत्री आम्ही रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य कुठेही फिरू देणार नाही राज्यात कुठेही सापडल्यास कुठलीही माहिती न देता पुढील उग्र स्वरूप काय असते अश्या राजकीय व प्रशासकीय यंत्रणेच्या होणाऱ्या परिणाम याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र सरकारच्या जबाबदारीवर राहील याची काळजी घ्यावी असे आवाहन प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य सुनील ठोसर यांनी आमच्या प्रतिनिधी बोलताना सांगितले