

सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी, 9423608179
चिमूर- ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथील गृह अर्थशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोज गुरुवार ला, महाविद्यालयाची प्राचार्य डॉ. सुनंदा आस्वले यांच्या अध्यक्षतेखाली रक्षाबंधन आणि कृष्ण जन्माष्टमी या पवित्र सणांचे औचित्य साधून *’स्वयंरोजगाराचे क्षेत्र’* या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळा अंतर्गत गृह अर्थशास्त्र विभागातर्फे इको फ्रेंडली राखी तयार करणे व दहीहंडी सजविणे या विषयावर विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक द्वारे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत विविध नैसर्गिक व विघटनशील वस्तूंच्या वापर करून राखी तयार करणे हे आकर्षणाच्या केंद्रबिंदू होता. या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हुमेश्वर आनंदे तसेच मार्गदर्शिका म्हणून समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सुशीला गजभिये उपस्थित होते. डॉ. हुमेश्वर आनंदे यांनी विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार अंतर्गत राखी तयार करून ‘कमवा व शिका’ या उपक्रमात सहभागी होण्याकरिता प्रोत्साहित केले. त्याचप्रमाणे प्रा. सुशीला गजभिये यांनी विद्यार्थ्यांना दहीहंडी सजविणे हे कशाप्रकारे स्वयंरोजगाराचे क्षेत्रात एक संधी निर्माण करू शकते तसेच सक्षम व कार्यकुशल युवा पिढी घडविण्यास मदत करू शकते, याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे संचालन गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. प्रणिता मानापुरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. श्रद्धा डोईजड यांनी केली. या कार्यशाळा द्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण पूरक सण साजरा करण्याबाबत जागरूकता निर्माण झाली. कार्यशाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.



