जि प शाळा दहिदुले येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा व विद्यार्थ्यांना दप्तर वाटप..

133

 

धरणगाव प्रतिनिधी पी डी पाटील सर

धरणगांव – १५ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी लेझीम पथकद्वारा प्रभात फेरी काढून स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा केला. प्रथम ध्वजारोहण जिल्हा परिषद शाळेत आदरणीय श्री.शामकांत साळुंखे साहेब (सेवानिवृत्त जिल्हा सहायक निबंधक, ठाणे ) यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर कवायत व लेझीम सादर केली. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनावर आधारित भाषणे दिली व गीतगायन केले विशेषता: माजी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला .श्री शामकांत साळुंखे साहेब यांच्याकडून विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले व शाळेचे मुख्याध्यापक श्री नंदलाल मराठे सर यांच्याकडून विद्यार्थ्यांना आयकार्ड वाटप करण्यात आले यानंतर माननीय श्यामकांत साळुंखे साहेब यांचा सत्कार विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री सुदर्शन भाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला व मा संतोष चौधरी साहेबांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री भाऊसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला व सर्व ग्रामस्थांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. कार्यक्रमास विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री सुदर्शन पाटील,गावाचे पोलीस पाटील श्री सुनील धनगर, ग्रामपंचायत सदस्य श्री गोकुळ पाटील, ग्रामपंचायत सदस्या सौ गुमनबाई गायकवाड,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री भाऊसाहेब पाटील, श्री अनिल पाटील, श्री सागरराव पाटील श्री मनोहर पाटील श्री आधार पाटील, श्री बाबुलाल पिंजारी, श्री भूषण गोसावी, श्री भालचंद्र धनगर,श्री दीपक धनगर, श्री नथू पिंजारी, श्री सुरेश सोनवणे, श्री विकास पाटील,श्री राहुल पाटील, श्री अधिकार पाटील श्री एकनाथ गायकवाड,अंगणवाडी सेविका व मदतनीस,आशा सेविका व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक श्री.नंदलाल मराठे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन श्री.उगलाल शिंदे सर यांनी केले, तर आभार श्री.समाधान पाटील सर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता मुलांना चॉकलेट वाटप करुन व श्री भाऊसाहेब पाटील यांच्याकडून ग्रामस्थांना चहापाण्याने झाली.