वर्षावास प्रवचन मालिकेतील आठवे पुष्प नालंदा बुद्ध विहार सणसवाडी येथे संपन्न

126

 

संजीव भांबोरे
महाराष्ट्र प्रतिनिधी
पुणे – सणसवाडी येथे रविवार दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता बुध्दिस्ट मुव्हमेंट सेंटर संचलित नालंदा बुद्ध विहार सणसवाडी ता. शिरूर जि.पुणे येथे भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा ( पूर्व ) अंतर्गत भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा शिरूर व तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था ( रजि. ) सणसवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास प्रवचन मालिकेतील आठवे पुष्प संपन्न झाले.
प्रवचन मालिका कार्यक्रमाच्या प्रारंभी तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आद. विश्वनाथ घोडके यांनी प्रास्ताविक केले. तदनंतर सरचिटणीस आयु. पोपट सोनवणे यांनी अध्यक्षपदाची सूचना मांडली. या सूचनेस कोषाध्यक्ष आयु भास्कर पाडळे यांनी अनुमोदन दिले. अध्यक्षपदाच्या सूचनेनुसार आयु. दिलीप जगताप गुरुजी संस्कार उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा शिरूर तालुका यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्विकारले.
उपस्थित प्रवचनकार आद. सुजाताताई ओव्हाळ, कार्यक्रमाचे अध्यक्ष आद. आयु. दिलीप जगताप गुरुजी, आद.आयु.नी. शारदाताई मिसाळ प्रचार व पर्यटन महिला सचिव भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा ( पूर्व ) , आद. आयु.नी शालिनीताई रोकडे महिला विभाग जिल्हा संघटक, आयु. अनिल कांबळे अध्यक्ष, आयु.पोपट सोनवणे सरचिटणीस, आयु भास्कर पाडळे कोषाध्यक्ष, आयु. मारुती ढसाळ संस्कार सचिव, आयु. देविदास पंचमुख संरक्षण उपाध्यक्ष, भैय्यासाहेब सोनकांबळे संरक्षण सचिव, आयु.रणजित कांबळे हिशोब तपासणीस, आयु. सुनिल गायकवाड आदर्श बौद्धाचार्य, आयु. विश्वनाथ घोडके अध्यक्ष तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांनी आदर्शांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून, दीप धूप प्रज्वलित करून आदर्शांच्या प्रतिमांचे पूजन केले. आयु. दिलीप जगताप संस्कार उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा शिरूर तालुका यांनी वंदना व सुत्तपठण घेतले.
तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पूर्व महिला कार्यकारिणी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आदरणीय आयु.नी. सुजाताताई ओव्हाळ, आदरणीय आयु.नी. शारदाताई मिसाळ महिला प्रचार व पर्यटन सचिव, आद.आयु.नी.शालिनीताई रोकडे संघटक महिला विभाग पुणे जिल्हा (पूर्व ) व भारतीय बौद्ध महासभा शिरूर तालुका नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल कांबळे, सरचिटणीस पोपट सोनवणे, कोषाध्यक्ष भास्कर पाडळे, संस्कार उपाध्यक्ष दिलीप जगताप , संरक्षण उपाध्यक्ष देविदास पंचमुख, संस्कार सचिव मारूती ढसाळ, संरक्षण सचिव भैय्यासाहेब सोनकांबळे, हिशोब तपासणीस रणजित कांबळे, आदर्श बौद्धाचार्य सुनिल गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.
‌‌आद. सुजाताताई ओव्हाळ महिला विभाग अध्यक्षा भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा ( पूर्व ) यांनी *बौद्ध धम्म आणि विज्ञान* या विषयावर सुश्राव्य प्रवचन दिले.
याप्रसंगी प्रवचनकार आद. आयु.नी. सुजाताताई ओव्हाळ, आयु.नी. शारदाताई मिसाळ, आदरणीय शालिनीताई रोकडे, भास्कर पाडळे, रणजित कांबळे, भैय्यासाहेब सोनकांबळे, अनिल कांबळे अध्यक्ष, आद. विश्वनाथ घोडके अध्यक्ष तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था सणसवाडी, आयु. पोपट सोनवणे सरचिटणीस यांनी उपस्थित शीलवान बौद्ध उपासक उपासिका यांना वर्षावास प्रवचन मालिकेकरिता मंगल कामना व्यक्त केल्या.
या प्रवचन मालिकेस तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व सदस्य,निळ वादळ संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा दीपिकाताई भालेराव,सामाजिक कार्यकर्त्या रिनाताई सोनवणे,तथागत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तात्याराम मोरे,वंचित शाखा अध्यक्ष तुकाराम मोरे, तक्षशिला बहुउद्देशिय सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष मोतीराम निकुंभ,सचिव मालोजी भेदेकर,सहसचिव हरीश गुडदे,सहखजिनदार दिलीप जाधव,सल्लागार चंद्रकांत कांबळे,श्रीराम नरवडे,अरुण गायकवाड,सदस्य सागर आगवणे,सूरज करंकाळ,गौतम मोरे,विनोद खंडारे,सुधाकर लोखंडे,आप्पा कांबळे,साहिल पवार,दिव्यरत्न निकुंभ, सुनील भिंगारे,विपुल घोडके,आदित्य झडते,सुभाष सोनवणे,गंगाधर गायकवाड,महाजन वाघमारे,ललिता पवार,सरिता खिराडे, सुषमा गुडदे,पूनम घोडके,पूजा अवथरे,संतोषी गायकवाड, सुप्रिया गायकवाड,ताई नरवडे,अनुष्का मोरे,नव्या खंडारे यांचेसह सणसवाडी परिसरातील बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस आयुष्यमान पोपट सोनवणे यांनी केले तर आभार तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव. आयु. भेदेकर एम.जी साहेब यांनी मानले.