अंध मुलींचे वसतीगृह अनुदानाशिवाय चालविणे कठीण- अध्यक्ष पी. आर. पाटी कै.मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठान तर्फे गुणवंत अंध विद्यार्थिनी सन्मानित

316

 

अमरावती ( प्रतिनिधी )
” माझ्या या वडाळी येथील अंध मुलींच्या वसतीगृहात इयत्ता ८ वी ते एम.ए.पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या अंध विद्यार्थिनी आहेत.माझ्या वसतीगृहाला शासनाचे कोणतेही अनुदान नाही.अंध मुलींच्या निवासाची, भोजणाची व शिक्षणाची संपूर्ण निशुल्क व्यवस्था मी संस्थाध्यक्ष पी.आर.पाटील व माझी पत्नी सौ.मंदा पाटील आमच्या स्वतःच्या पगारातून व काही देणगीदाराच्या मदतीने करतो.
पण ती देणगी हवी तशी मिळत नाही.प्रा.बुंदेले,प्रा.बनसोड सरांसारखे देणगीदार मिळाले तर अंध विद्यार्थिनींना सांभाळणे सोपे होईल.अनुदानाशीवाय हे वसतीगृह चालविणे कठीण आहे.आम्ही दोघेही अंध आहोत;
प्रा.बुंदेले यांनी दोन ऑगस्टला स्वतःची चौसष्ठी येथे अंध मुलींना जीवनावश्यक वस्तूंची भेट देऊन साजरा केली आणि आज त्यांनी स्वातंत्र्य दिन व स्वतःच्या वडिलांचा स्मृतिदिन माझ्या अंध मुलींच्या वसतीगृहात येऊन अंध मुलींना जीवनावश्यक वस्तूंची भेट देऊन साजरा केला.मी त्यांचे आभार मानतो,अशीच मदत इतरांनीही आम्हाला करावी यासाठी मी संस्थेचा 8788310430 हा फोन पे नंबर येथे देत आहे.”असे विचार संस्थाध्यक्ष पी.आर. पाटील यांनी व्यक्त केले .
ते कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान तर्फे श्री पी. आर.पाटील शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित अंध मुलींचे वसतीगृह,वडाळी येथे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात व आदर्श नगरसेवक कै.बाबारावजी बुंदेले यांच्या १५ ऑगस्टला असलेल्या २४ व्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून विचार व्यक्त करीत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पी.आर.पाटील,प्रमुख अतिथी समाजप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बुंदेले,अपेक्षित समाज महासंघाचे अध्यक्ष समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड,श्री मुकेश जोगेकर होते.
सर्व अंध मुलींनी व
मान्यवरांनी हाती झेंडे घेऊन स्वातंत्र्य दिन चिरायू होवो,भारत माता की जय असे अनेक देशभक्तीपर नारे दिले.
प्रा.अरुण बुंदेले व प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांनी अंध मुलींना जीवनावश्यक वस्तू भेट देऊन स्वातंत्र्य दिन साजरा केला.

—-

कै.मैनाबाई बुंदेले प्रतिष्ठनतर्फे
अंध विद्यार्थिनी कु.सोनल
निटोणे सन्मानित

 

कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठानतर्फे अंध मुलींच्या वसतीगृहातील अंध विद्यार्थिनी कु.सोनल प्रभाकर निटोणे ने एम.ए. प्रथम वर्ष-इतिहास या विषयात ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल कै.बाबारावजी बुंदेले स्मृती पारितोषिक सन्मानपत्र,प्रा.बुंदेले लिखित “आदर्श अभ्यासाचे तंत्र ” व ” निखारा ” ही दोन पुस्तके, रोख रक्कम पाचशे रुपये देऊन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अरुण बुंदेले,उपेक्षित समाज महासंघाचे अध्यक्ष समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड, संस्थाध्यक्ष श्री पी.आर.पाटील,सचिव श्री मुकेश जोगेकर या मान्यवरांनी सन्मानित केले.

——-

शाहिदांना स्मरण करून भारत सुंदर
करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक – प्रा.अरुण बुंदेले

. ” स्वातंत्र्य दिन आज संपूर्ण भारतभर उत्साहात साजरा होत आहे. भारताच्या स्वातत्र्यसंग्रामातील शहिदांना स्मरण करून आपण भारतीयांनी स्वत:च्या कर्मातून भारत सुंदर करण्याचा प्रयास केला पाहिजे. वर्ग ८ ते एम.ए.पर्यंतच्या अंध मुलींची रात्रंदिवस सेवा करून स्वतःचा व पत्नीचा अर्धा पगार त्यांच्यासाठी खर्च करणारे संस्थाध्यक्ष श्री पी.आर.पाटील त्यांच्या पत्नी सौ.मंदाताई व श्री मुकेश जोगेकर कोणत्याही प्रकारचे संस्थेला शासकीय अनुदान नसताना खऱ्या अर्थाने देशसेवा करीत आहेत.त्यांच्या संस्थेतील अंध मुलींसाठी जीवनावश्यक वस्तूंची आपण मदत केली पाहिजे असे मला वाटते.त्यांनी निर्माण केलेला अंधांचा आर्केस्ट्रा सुद्धा अप्रतिम आहे. या अंध मुली त्यातील गायिका आहेत.माझे बाबा आदर्श नगरसेवक कै.बाबारावजी बुंदेले यांचा आज चोविसावा स्मृतिदिन. बाबांनी तत्कालिन काळात नगरसेवक पदावर असताना व इतर वेळी केलेली समाजसेवा हीच माझ्या विविध प्रबोधन मालेची प्रेरणा आहे. म्हणूनच बाबांचा २४ वा स्मृतिदिन मी येथे साजरा केलेला आहे.त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाला माझे विनम्र अभिवादन.” असे विचार प्रा. अरुण बुंदेले यांनी प्रमुख अतिथी पदावरून व्यक्त केले.

——

राष्ट्रभक्तीची अखंड ज्योत
तेवत ठेवणे आवश्यक-प्रा.श्रीकृष्ण बनसोड

” भारतात आज जी परिस्थिती दिसत आहे त्यावरून असे वाटते की,आज राष्ट्रभक्तीची खरी गरज आहे. शहिदांनी स्वतःच्या बालिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले.
आपल्याला ते टिकवून ठेवण्यासाठी राष्ट्रभक्तीची अखंड ज्योत तेवत ठेवणे आवश्यक आहे. श्री पी.आर.पाटील अंध मुलींच्या शिक्षणापासून त्यांचे लग्न लावून देण्यापर्यंत स्वतः अंध असून जे कार्य करीत आहेत अशा देशसेवेची आज गरज आहे . “असे विचार प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी प्रमुख अतिथी पदावरून व्यक्त केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी साहित्यिक प्रा अरुण बुंदेले, समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड श्री मुकेश जोगेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला एम.ए. (इतिहास )द्वितीय वर्षाला असलेल्या कु.सोनल प्रभाकर निटोने, वर्ग १० वी ला असलेल्या नांदेड येथील कु.समीक्षा अंबादास हनुवते,यवतमाळ येथील कु.रेणुका मारोती कांबळे, नांदेड येथील कु.संध्या बालाजी हमपोलकर,दारव्हा येथील कु.प्रगती सुधाकर ढवळे या अंध विद्यार्थिनी व अंधांच्या आर्केस्ट्रातील नागपूर येथील ढोलक वादक शिवप्रसाद पुळेकर व वाशिम येथील ऑर्गन वादक मुकेश इंगळे हे अंध कलाकार उपस्थित होते तसेच कार्यक्र माला संस्थेच्या कोषाध्यक्षा सौ.मंदाताई पाटील,सदस्या सौ.दीक्षा जोगेकर व नागरिकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने झाली .