

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*
राजुरा – छत्रपती मॉर्निंग ग्रुप राजुरा यांच्या वतीने राज्यस्तरीय दौड स्पर्धेत निवड झालेले आयुष टेकाम यांच्या आर्थिक परिस्थितीला समझून एक हाथ मदतीचा या देय प्रेरनेतून त्याला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
याच संकलपनेतून शिवसेना कामगार नेते बबन उरकुडे यांनी मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सदस्यांना विनंती केली असता त्याच्या पुढील वाटचालीसाठी 15000 रुपयाची आर्थिक मदत करण्यात आले.
सामाजिक आर्थिक बांधिलकी जोपासत ही मदत करण्यात आली. यामध्ये हितेश येरणे, भुरे सर, आसामपल्ली सर,दिनेश पारखी, सुनील धानोरकर, खंडारे साहेब, शंकर भाऊ पारखी, शेख पटवारी साहेब, रवींद्र बोडाले जावई, रुपेश बोर्ड, चेतन इटणकर, उपासे सर, सत्यपाल गेडाम, मात्रे सर,गणेश मुसळे, बोंडे सर, रमेश आस्वले,
वाभीटकर सर तसेच अनेक सहकार्यांनी मदत केली.
उर्वरित सदस्यांनी लवकरात लवकर यथा शक्ती मदत करावी ही विनंती करण्यात आली.



