गोवरी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

73

 

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

राजुरा : तालुक्यातील गोवरी येथे नागठाना मंदिर कमिटीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. निसर्गाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत चालला आहे.वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असल्याने झाडांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे झाडे लावा, झाडे जगवा,ही शासनाची संकल्पना पुढे नेण्यासाठी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या दृष्टीने नागठाणा मंदिर कमिटीच्या वतीने मंदिर परिसरात मोकळ्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गोवरी येथील नागठाणा मंदिर कमेटीतर्फे सामाजिक कार्यकर्ते पंढरी झाडे,ज्येष्ठ नागरिक रामकिसन लांडे, शिवराम लांडे, विकास पिंपळकर,अनिल बोबडे, सुजित बोबडे,प्रकाश काळे व नागरिक उपस्थित होते.