आजही संत तुकोबांचे अभंग अजरामर आहेत-प्रा. डॉ.दादाराम साळुंखे

54

 

 

कराड (प्रतिनिधी, दि. 22 ) “लेखन करणे म्हणजे जीवनात आलेले अनुभव विश्व मांडणे होय. साहित्याची निर्मिती ही सहजपणे होत नाही. तर ती स्वअनुभवातून, आनंदातून होत असते. म्हणूनच आजही संत तुकोबांचे अभंग अजरामर आहेत.” असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. दादाराम साळुंखे
यांनी केले. ते वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडच्या कनिष्ठ विभागाच्या भाषा, वाड:मय, वादविवाद स्पर्धा व राष्ट्रीय सेवा योजना या समित्यांच्या उद्घाटन समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, “विध्यार्थ्यांना आईच्या डोळ्यातले पाणी दिसले पाहिजे. कारण जीवनातली सात वर्ष मेहनत घेतली तर पुढील सत्तर वर्षाची शिदोरी तयार होते.” अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्राचार्या डॉ. एस. आर. सरोदे यांनी विध्यार्थ्यांना एन. एस. एस च्या सर्व उपक्रमात सहभागी होण्याची संधी आहे. कारण समाजसेवेतूनच मानवसेवा घडत असते असे मत व्यक्त केले.
यावेळी उपप्राचार्य आर. ए. कांबळे पर्यवेक्षिका एस. एस. मधाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम अधिकारी पवार एस. पी. यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.डॉ. एस. एस. लावंड यांनी परिचय करून दिला. डॉ. पी. एस. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. श्री के. एस. महाले यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास प्राध्यापक व विध्यार्थी -विध्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.