अर्हेर – नवरगाव येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

340

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.23ऑगस्ट):- लहान मुलांना मान देण्याची परंपरा म्हणून साजरा करण्यात येणारा ताना पोळा शहरात व खेड्यात वेगवेगळ्या भागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. अर्हेर – नवरगाव गावातील चौकात राममंदिर समोर भरविण्यात आलेल्या तान्ह्यापोळ्यात चिमुकल्यांनी आपापल्या नंदीबैलांना घेऊन प्रचंड प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती. पोळ्यात सहभागी झालेल्या चिमुकल्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

त्यांना घेऊन आलेले पालक तसेच इतर गावातील नागरिक या चिमुकल्यांच्या बैलांच्या सजावटी बैलांची प्रशंसा करीत होते. वेगवेगळ्या आकर्षक वेशभूषा आणि केशभूषा करून आलेले बालगोपाल आणि त्यांचे चिमुकल्याचे नंदी नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. अशाप्रकारे गावातील चिमुकले नंदीबैलाला घेऊन या तान्ह्यापोळ्यात सहभागी झाले होते. चिमुकल्याना सुभाष ठेंगरे, मुन्ना कावळे, रमेश करंडे व इतर मान्यवरांच्या हस्ते आकर्षक पुरस्कार देण्यात आले.