

संजीव भांबोरे
भंडारा-साकोली येथील श्याम हॉस्पिटल येथील डॉ देवेश अग्रवाल यांनी सोनोग्राफी रूम मध्ये एका मुली सोबत अश्लील चाळे केल्याबद्दल त्यांच्यावर पोस्को आणि अनुसूचित जाती ,जनजाती व विविध कलमासह गुन्हा दाखल झाला होता .गुन्हा दाखल झाल्याबरोबर तो 15 दिवस फरार होता. शेवटी कोर्टामध्ये तो स्वत शरण आला .परंतु त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी, निपक्ष चौकशी व्हावी व त्याच्याबद्दलची चार्टसीट लवकरात लवकर दाखल करण्यात यावी आणि पुरावे गोळा करून त्यांना कठोर शासन व्हावे या दृष्टिकोनातून पोलीस विभागाने प्रयत्न करावे यासाठी महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक नरूल हसन यांच्या कार्यालयात जाऊन या विषयावर चर्चा करून लवकरात लवकर चार्टशीट दाखल करावे अशी मागणी केली .याप्रसंगी महामाया सामाजिक न्याय संघटनेचे संस्थापक डी .जी .रंगारी ,महामाया सामाजिक न्याय संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष शितल नागदेवे ,सामाजिक संघटनेचे विदर्भाचे पदाधिकारी रत्ना खंडारे, सदस्य आम्रपाली मोटघरे व इतरही महिला कार्यकर्त्या याप्रसंगी उपस्थित होते.



