गणेश उत्सव पर्व निमीत्त बचत गटाच्या हस्तकला वस्तूंचे विक्री प्रदर्शन

57

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.25ऑगस्ट):- महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी गणेश उत्सव पर्व निमित्त जिल्हा परिषद चंद्रपूर येथे ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या वास्तूचे “वस्तू विक्री प्रदर्शन” दिनांक २५ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजीत करण्यात आले आहे. 

या प्रदर्शनात जिल्ह्यातील बचत गटांनी तयार केलेल्या पारंपरिक हस्तकला वस्तू, गणपती मूर्ती, गणपती डेकोरेशन, सजावट वस्तू, पूजेच्या वस्तू, मातीची भांडी, गृहउपयोगी साहित्य, अन्नप्रकार व सौंदर्यप्रसाधने विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे.

प्रदर्शनात ४५ हून अधिक बचत गट सहभागी असणार यामध्ये पापड, लोणची, मसाले, शिवणकाम वस्तू, हस्तनिर्मित दागिने, गणपती मूर्ती, गणपती डेकोरेशन, सजावट वस्तू, पूजेच्या वस्तू, मातीची भांडी, गृहउपयोगी साहित्य, विणकाम उत्पादने यांचा समावेश असणार. ग्राहकांनी या वस्तूंना भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन श्री. पुलकित सिह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर व श्री. गिरीश धायगुडे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.