

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
▪️गेल्या दोन दशकांपासून झाडाचे करताय संरक्षण
राजुरा(दि.२७ऑगस्ट):-भारतात प्रख्यात कवयित्री गिरीजा कुमार माथूर यांनी हिंदीमध्ये “हम होंगे कामयाब ” चे शाब्दिक भाषांतर केले जे १९७० ते ८० च्या दशकात विशेषता शाळांमध्ये लोकप्रिय देशभक्ती ,अध्यात्मिक , सकारात्मक ऊर्जा देणारे गाणे बनले. या गीतांच्या ओळीप्रमाणे कार्य केले राजुरा येथील इंदिरा नगर वार्ड मध्ये राहणारे महेंद्र वनकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबांनी. जवळपास दोन दशकांपासून हे जांबाचे झाड त्यांनी वाचवले.
पंधरा ते वीस वर्षांपूर्वी लावलेल्या झाडाला फळ लागतील आणि त्याचा आस्वाद सर्वांना घेता येईल शिवाय सावली पण राहील या उद्देशाने आपल्या घराची शान वाढविणारे हे जांबाचे झाड त्यांनी लावले. परंतु वाढत्या मानवी गरजा लक्षात घेता घराचे पक्के बांधकाम करायचे होते. पण मधात आले हेच झाड. तरीही आपण लावलेले झाडं तोडण्यापेक्षा झाडही वाचले पाहिजे आणि घराचे बांधकामही झाले पाहिजे अशा भावनेतून वनकर कुटुंबीयांनि चक्क घराच्या पक्क्या छताला झाडाच्या खोडापासून गोल जागा सोडून बांधकाम केले आणि आज ते जांबाचे झाडं मोठया डौलात उभे राहून मनसोक्त फळ देत आहे.
आयुष वनकर हा त्यांचा मुलगा इयत्ता तिसरी मध्ये आशादेवी प्राथमिक शाळेत शिक्षण घेतोय तर मुलगी लहान आहे. बालवयात या मुलांवर देखिल वृक्ष संवर्धनाचा संस्कार केल्याने पुढच्या पिढीला नक्किच चांगली दिशा मिळत आहे. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांनी वनकर कुटुंबीयांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे कौतुक केले.
एकीकडे पदाचा, पैशांचा, विकासाच्या,बांधकामाच्या नावावर अवैधरित्या मोठ्याप्रमाणात वृक्षतोड सुरू असताना वनकर सारखे कुटुंब एक झाड वाचविण्यासाठी संकल्प करून तो पूर्णही करीत असल्याने परिसरातील नागरिकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “एक पेड माँ के नाम” अंतर्गत अनेक बनावट वृक्षलागवड करून प्रमाणपत्र मिळविणाऱ्यांना आयुष वनकर सारख्या विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबियांचा नक्किच आदर्श घेतला पाहिजे आणि केवळ प्रतिज्ञा, शपथ असं घेऊन चालणार नाही तर प्रत्यक्षात वृक्ष संवर्धन केले पाहिजे.



