

▪️योग्य आहार व चांगल्या सवयी आपल्यामध्ये रुजवणे – ज्ञानेश्वर शिंपी ( समुपदेशक ग्रामीण रुग्णालय धरणगाव)
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)
धरणगांव(दि.28ऑगस्ट):- शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे ग्रामीण रुग्णालय धरणगाव यांच्या वतीने किशोरवयीन मुलांची संवाद, चर्चा व एड्स संदर्भात जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रस्ताविक शाळेतील उपशिक्षक एस एन कोळी यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक ज्ञानेश्वर शिंपी, गणेश कुंभार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ राजेश्वर काकडे उपस्थित होते. शाळेच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ.मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाने हे जनजागृती शिबिर घेण्यात आले. समुपदेशक ज्ञानेश्वर शिंपी यांनी विद्यार्थ्यांना शिशु, बाल्य, किशोर, युवा, प्रौढ, वृद्ध अवस्थे संदर्भात विस्तृत मार्गदर्शन केले. ग्रामीण रुग्णालयाचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ राजेश्वर काकडे यांनी एच.आय.व्ही. एड्स संदर्भात विद्यार्थ्यांना विस्तृत अशी माहिती दिली व विद्यार्थ्यांचे शंकांचे निरसन केले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एन ओळीत तर आभार पी डी पाटील यांनी मानले.



