ग्रामगीता महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ उत्साहाने साजरा

73

 

 

चिमूर – ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथे दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोज शुक्रवार ला, ‘हॉकीचे जादूगार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महान हाॅकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवसानिमित्त ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ उत्साहाने साजरा करण्यात आला. हा दिवस खेळ आणि तंदुरुस्तीचे महत्त्व वाढवण्यासाठी, तसेच खेळाडूंच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. महाविद्यालयाची प्राचार्या डॉ. सुनंदा आस्वले यांच्या मार्गदर्शनाखाली, महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचे वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून डॉ. हुमेश्वर आनंदे, डॉ. मृणाल वऱ्हाडे आणि डॉ. निलेश ठवकर उपस्थित होते. पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करताना हॉकीचे सर्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जीवन परिचय आणि हॉकीच्या मैदानात त्यांच्याद्वारे करण्यात आलेले अविश्वसनीय कामगिरीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच विद्यार्थी जीवनात खेळाचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. संदीप सातव यांनी मांडले तर आभार प्रदर्शन श्री मुकेश भिमटे यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येत विद्यार्थी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.