विविध सामाजिक संदेश देत विद्यार्थांनी केली नंदिबैल सजावट.

77

 

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

 

राजुरा- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा व नैसर्गिक पर्यावरण व मानवता विकास संस्था चनाखा (ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमाने नंदिबैल सजावट स्पर्धा चे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी गट साधन केंद्र राजूरा च्या विषयतज्ञ ज्योती गुरनुले अध्यक्षस्थानी होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक दिपक सातपुते, पालक प्रतिनिधी विशाल दवंडे, सहाय्यक शिक्षक बंडू बोढे, सोनल नक्षीने, दिपक मडावी, सुवर्णा कोटरंगे, सविता गेडेकर, नेहा तळवेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
बालवाडी व वर्ग 1 ते 2 गट क्रमांक 1 व वर्ग 3 ते 5 चा 2 रा गट अशाप्रकारे स्पर्धेची विभागणी करण्यात आली. विद्यार्थांनी नंदिबैल सजावट तसेच वेशभूषा परिधान करून स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. बालगोपालांनी नंदिबैल सजावट स्पर्धचा आनंद लुटला. तसेच प्रत्येक गटातून प्रथम, दितीय, तृतीय व प्रोत्साहनपर क्रमांक देऊन सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले व परीक्षक म्हणून आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजूरा च्या सहाय्यक शिक्षिका रोशनी कांबळे, अर्चना मारोटकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक बंडू बोढे यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापक दिपक सातपुते यांनी व आभार शिक्षक दिपक मडावी यांनी मानले.