राजुरा नगरीत श्रीगुरुदेव क्रांतिज्योत यात्रेचे थाटात आगमन

101

 

 

 

 

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

राजुरा- वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे वस्तीगृह, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय राजुरा येथे क्रांतिज्योत यात्रेचे वस्तीगृहातील मुला मुलींने व तालुक्यातील श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी थाटात स्वागत केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा प्रचारप्रमुख रुपलालदादा कावळे, मुख्य मार्गदर्शक यात्रा प्रमुख सुनील बुरुडे जिल्हासेवाधिकारी भंडारा, प्रमुख अतिथी अशोक चरडे चंद्रपूर जिल्हा सेवाधिकारी, अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ, मोझरी, विनायक सावरकर नागपूर विभाग प्रमुख,राजेंद्र गाडगे मध्यवर्ती प्रतिनिधी अकोला, किशोर धानोळे प्रचारक, वसंतराव निखाडे तालुका प्रमुख वरोरा, गजानन आजमिरे सेवक प्रचारविभाग गुरुकुंज मोझरी, ह. भ. प. तुंबळे महाराज वाकडी तेलगाणा राज्य, बापूजी लांडे जेष्ठ प्रचारक, चिंतलवार सर पर्यवेक्षक म. ज्यो फुले विद्यालय राजुरा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून सुशील बुरुडे यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या, प्राणाचे बलिदान देणाऱ्या क्रांतिकारी शूरवीरांच्या कृतिकार्याची आठवण करून देत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे स्वातंत्र्य लढ्यात असलेले योगदान काय होते यावर प्रकाश टाकला. जेव्हा चिन सोबत युद्ध सुरु होते महाराज सीमेवर जाऊन ‘आवो चिनीओ मैदान मे, देखो हिंद का हात, तयार हुआ भारत अब हिंद तुम्हारे साथ’ असे उदगार काढत सैनिकांना चेतविण्याचे कार्य केले असे मत मांडले तसेच प्रा. रुपलालदादा कावळे यांनी समजासेवेचा ध्यास धरावा आणि आपले जीवन उज्वल करावे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी गुरूदेव सेवा मंडळ चे रामदास चौधरी तालुका प्रचारक, अनिल चौधरी, प्रभाकर बोबाटे, उत्तम अवघडे, ह. भ. प. सद्गुरू शैलेश महाराज कावळे, ह. भ. प. रामप्रसाद महाराज बुटले, ह. भ. प. परशुराम महाराज साळवे, डॉ. रितेश ठाकरे, देविदास वांढरे प्रसिद्धी प्रमुख, प्रा.राजेंद्र मालेकर, वाघमारे महाराज, सोमवलकर गुरुजी, मारोती राजूरकर, योगेश लांडे, बाळकृष्ण ताणकर, सुधाकर परसूटकर, सुधाकर बावणे, गजेंद्र ढवस,जुमनाके, गणेश कुडे, आनंदराव वडस्कर, शंकर थेरे, सदानंद गावळे, नंदकिशोर नांदे, विनायक सोयाम, लोमेश मडावी सर, माधुरी रामप्रसाद बुटले, प्रा. नलिनी मेश्राम, सुवर्णा कावळे, सातपुते ताई, माही सातपुते, लता ठमके ताई, पिंपळकर ताई, बांगडे ताई, वर्षा मालेकर,सुधा काकडे , माधुरी लांडे ,इत्यादी सेवकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजुरा तालुका सेवाधिकारी मोहनदास मेश्राम यांनी केले, संचालन ग्रामगिता जिवन विकास परीक्षा तालुका प्रमुख प्रकाश उरकुंडे यांनी केले तर आभार उपतालुका प्रमुख मारोती सातपुते यांनी मानले. या कार्यक्रमाला तालुक्यातील गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.