चंद्रपूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाच्या अध्यक्ष पदी संजय वददेलवार तर सचिव पदी पंकज कोहळे

64

 

 

 

 

चंद्रपूर- महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना संलग्न चंद्रपूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाची बैठक स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत चंद्रपूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाची कार्यकारणी घोषित करण्यात आली. जिल्हाध्यक्ष संजय वददेलवार व सचिव पंकज कोवळे यांची बहुमताने निवड करण्यात आली.
बैठक राज्य संघटनेचे संघटक सचिव विनोद पन्नासे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. मागील कार्यकारणीचा कार्यकाल संपल्यामुळे नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली. ही प्रक्रिया निवडणूक पर्यवेक्षक म्हणून महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे विभाग प्रमुख मनीष वासनिक (नागपूर) यांच्या उपस्थितीत पार पडली.
या कार्यकारणीत कार्याध्यक्ष विनोद पन्नासे, उपाध्यक्ष गंगाधर बिरे, संघटन सचिव प्रमुख पन्नासे, महासचिव मेघराज टोणपे, कोषाध्यक्ष सुभाष मांदडे, सह कोषाध्यक्ष सूर्यभान कार्लेकर, मार्गदर्शक दिलीप होकम, प्रसिद्धीप्रमुख चंद्रशेखर मते, सागर कोहळे व सदस्यांची निवड करण्यात आली.

वृत्तपत्र विक्रेता हा प्रिंट मीडियाचा महत्त्वाचा घटक आहे परंतु किमतीच्या आधारावर मिळत असलेल्या तुटपुंज्या कमिशनवर विक्रेता आपला उदरनिर्वाह करीत आहे. त्यांचे जीवनमान उंचावणे करिता व त्यांचे हित जोपासत विक्रेत्यांच्या कल्याणाकरिता सतत प्रयत्न करण्याचे आवाहन नवनिर्वाचित अध्यक्ष संजय बद्दलवार यांनी केले. नवनिर्वाचित पदाधिकारी यांना मच्छिंद्र वाळके, प्रवीण मुन, विजय बल्लेवार, अनिल होकम, अरविंद खोब्रागडे, सतीश रामटेके, आतिश बिरे, विजय कोडापे, सुनील कटकमवार व जिल्ह्यातील इतर विक्रेत्यांनी शुभेच्छा दिल्या.