

‘द्रव्य’ आणि ‘भाव’ श्रावक असे दोन प्रकारचे श्रावक असतात असे जैन धर्मग्रंथात सांगण्यात आले आहे. जे जैन कुळात जन्मले असतात परंतु त्यांना सम्यक दर्शन प्राप्त नसते ते ‘द्रव्य’ श्रावक म्हणून ओळखले जातात. ९ तत्त्व, १२ व्रत आणि सम्यक दर्शन ज्यांच्यात असते ते ‘भाव’ श्रावक असतात. श्रावक साधक ‘अम्मा पियरो’ म्हणजे आई वडील आपल्या अपत्यांवर निस्सीम प्रेम करतात तसेच प्रेम साधु-साध्वींवर करतात. त्याचे प्रत्यक्ष उदाहरण हरिभद्र सुरी साधू आणि श्रावकाचे देण्यात आले. हरिभद्र यांचा ग्रंथ लेखन कार्याचा संकल्प पूर्ण करता यावा यासाठी रात्री लेखन कार्याकरीता श्रावकाने आपली मालमत्ता विकून रात्री प्रकाश देणारा ‘चंद्रकांत मणी’ दिला. धन तर कधीही कमावले जाते परंतु धर्म, गुरू यांच्याप्रती असलेली श्रद्धा मोलाची ठरते, तेच खरे ‘अम्मा पियरो’ श्रावक ठरतात. अम्मा पियरो श्रावक यांचे जीवन हे श्रद्धा, संयम व सेवाभावाचे प्रतीक आहे. जैन साधूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी धर्माचरण करताना करुणा, सत्य आणि अहिंसा या मूल्यांचा अंगीकार केला. त्यांच्या साधनेतून आपल्याला समजते की लौकिक जबाबदाऱ्या पार पाडत असतानाही आत्मशुद्धी व अध्यात्म साधता येते. याच संदर्भात आचार्य सुभंकर मुनी आणि सुव्रत श्रावक याची वास्तव अख्यायिका प. पू. डॉ. उदितप्रभाजी म.सा. यांनी प्रवचनात सांगितले.
जीवनात इंद्रीय संयम असणे अत्यंत आवश्यक आहे. बोलणे आणि खाणे-पिणे या बाबत संयम ठेवण्याचा मोलाचा व प्रेरक संदेश आजच्या प्रवचन सभेत देण्यात आला. आपली वाणी उत्तम, संयमीत असावी. एका गावात दोन नेते पुढारी सभेसाठी गावात पोहोचतात. भाषणात बोलताना ‘गावातील अर्धे लोक वेडे आहेत? असे बोलले. श्रोत्यांना वाईट वाटते. दुसरे नेते परिस्थती सावरायला भाषणासाठी उठले व म्हणाले की, या गावातील अर्धे लोक अत्यंत हुशार आहेत. पहिले पुढारी जे बोलले तेच दुसरे ही बोलले. संयम आणि प्रिय वक्तव्य त्यांनी केले. ज्या प्रमाणे बोलने संयमीत असावे तसेच जिभेला पण संयमीत ठेवावे असे मोलाचे विचार प. पू. इमितप्रभाजी यांनी व्यक्त केले.
या प्रवचन सभेत जामनेर येथील मुमुक्षु भगिनी कोमल छाजेड यांचे मनोगत झाले. १६ जानेवारी २०२६ रोजी जामनेर येथे होणार आहे. प.पू. डॉ. सुप्रभाजी म.सा. आदीठाणा सहा यांच्यासह जळगाव श्री संघाच्या सदस्यांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याची विनंती सादर केली.
(शब्दांकन – किशोर कुळकर्णी, मो. 94227 76759)



