विद्यार्थी-पालक गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

203

प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515) गंगाखेड शहरातील डॉ.के.पी.गारोळे एज्युकेशन सेंटर आणि भार्गव करिअर अकॅडेमी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 29 ऑगस्ट शुक्रवार रोजी मोरया फंक्शन हॉल येथे ‘विद्यार्थी-पालक गुणगौरव सोहळा २०२५’ उत्साहात संपन्न झाला.दीपप्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.के.पी.गारोळे एज्युकेशन सेंटरचे चेअरमन डॉ.के.पी.गारोळे होते,संचालिका किरण गारोळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असलेले प्रा.भार्गव राजे डायरेक्टर भार्गव करिअर अकॅडमी नांदेड यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
आयोजित कार्यक्रमांमध्ये एमबीबीएस मध्ये प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एकूण 27 विध्यार्थी 2024-25 मधील अकॅडमिकमध्ये प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांक मिळवणारे मानकरी ठरले.इयत्ता आठवीतील नवोदय पात्र दोन विध्यार्थिनी स्कॉलरशिप पात्र एकूण 9 विध्यार्थी वर्ग पाचवा आणि आठवा होमीभाभा परीक्षा उत्तीर्ण झालेले दोन विध्यार्थी नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड झोनल फोर्थ रँक पटकविणारी गारोळे एज्युकेशन सेंटरची जिल्ह्यातील एकमेव विध्यार्थीनीं वैभवी हुरगुळे ठरली नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड मध्ये पात्र ( सेकंड लेवल)ठरलेले एकूण 10 विध्यार्थी.नॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड मध्ये विशेष प्रवीण्यासहित पात्र ठरलेले 08 विध्यार्थी नॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड मध्ये विशेष प्रवीण्यासहित पात्र ठरलेले 03 विध्यार्थी. नुकतेच ज्यांनी एमबीबीएस साठी प्रवेश पात्र यादीत आपले नाव मिळवून आपले व आपल्या पालकांचे स्वप्न साकार केले असे एकूण 11 विध्यार्थी. सर्वं विध्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा सन्मानचिन्ह, शाल,बुके देऊन गौरव करण्यात आला.
संस्थेच्या डायरेक्टर किरण गारोळे यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली सहशिक्षक व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.तुकाराम हुरगुळे यांनी केले सूत्रसंचलन शाळेचे प्राचार्य प्रा.एम.एम.सुरनर.यांनी केले तर आभार शाळेचे उपप्राचार्य जगदीश मंदोडे यांनी मानले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली कार्यक्रमास शहरातील व परिसरातील विद्यार्थी पालक वर्गांची मोठ्या संख्येने उपस्थित होते