

✒️खामगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
खामगांव(दि.2ऑगस्ट):– गौ – सेवेत सदैव तत्पर असलेल्या व कुठलीही जाहिरात न करता एकनिष्ठा गौ -सेवा रक्तसेवा फाउंडेशनच्या गौ सेवकांनी वाचविले गायीचे प्राण. दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी येथील सामान्य रुग्णालयातील क्षतीग्रस्त झालेल्या आणि खूप वर्षा पासून तुटलेल्या अवस्थेत पडलेल्या शेपटी टॅंकच्या आजूबाजूला मोठमोठाली खूप झाडे झूडपे होती कदाचित त्यामुळे त्या बेवारस गायीला शेपटी टॅंक दिसलं नसेल ती गाय चरायला गेली असता तिचा तौल सांभाळ्या गेला नसल्यामुळे ती शेपटी टॅंक मध्ये पडून मलब्याखाली दबली होती.
सामान्य रुग्णालयातील शासकीय कॉर्टर मधील राहणारे कर्मचारी सुरेश बागडे यांच्या घराच्या मागील भागातून एकदम जोराचा आवाज आला त्यांनी जाऊन पाहिले तर एक पांढऱ्या रंगाची मोठी गाय शेपटी टॅंक मध्ये पडलेली होती आणि ती पुर्ण मलब्याखाली दबलेली होती तिला जर वेळेवर काढल्या नाही गेले तर तिचा जिव जाऊ शकते अशी धास्ती मनात धरून बागडे यांनी एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनला सायंकाळी 5:32 ला फोन कॉल द्वारे घटनेची माहिती दिली गौ सेवक सुरजभैय्या यादव, शुभम शमी हे लगेच तिथं पोहचले आणि शेपटी टॅंक मध्ये उतरून दबलेल्या गायीला मलब्याखालून तिला मोकळे केले गायीने मोकळा श्वास घेतला.
एकनिष्ठा गौ सेवकांनी दोरीच्या सहाय्याने गायीला शेपटी टॅंकच्या बाहेर काढले या गौ सेवेत एडव्होकेट मनदीपसिंग चव्हाण, आशुतोष गंगे, संतोष डवंगे, अभिषेक अतकरे, सोनु ठाकुर, श्याम कोथळकर, तुषार भालेराव, निखिल चंदन, सुनिल खुटाफळे आदि धाडसी गौ सेवकांना गायीचे प्राण वाचविण्यात यश आले. ही घटना सामान्य रुग्णालयातील अधिकारी यांच्या हलगर्जी पणा मुळे घडली अशी चर्चा उपस्थित नागरिकां कडून होत आहे.
क्षतीग्रस्त शेपटी टॅंक विझाविण्यात यावा आणि त्या परिसरातील झाडे झूडपांची छटाई करून घ्यावी जेणेकरून पुढे अश्या घटना घडतील नाही अशी प्रतिक्रिया देत सुरजभैय्या यादव यांनी प्रशासनाच्या गलथान कारोभारावर रोष व्यक्त केले आणि पुढे कठोर पाऊल उचलून वरिष्ठाकडे तक्रार करण्यात येणार आहे अशी ग्वाही नागरिकांना दिली. आशुतोष गंगे यांनी ही माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.



