

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.3सप्टेंबर):-ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोज बुधवार पासून चिमूर तालुक्यातील पूरग्रस्त क्षेत्रात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. गत काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे उमा नदीकाठच्या सर्व परिसर पुराच्या विळख्यात सापडला होता. पुराच्या पाणी ओसरल्यानंतर, पूरग्रस्त क्षेत्रात सर्वत्र घाणीचे वातावरण असते, आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या आजार पसरण्याची शक्यता असते.
ही बाब लक्षात घेता महाविद्यालयाची प्राचार्य डॉ. सुनंदा आस्वले यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या नेतृत्वात चिमूर च्या पूरग्रस्त क्षेत्रात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांद्वारे नाल्या साफ करणे, कोसळलेल्या घरांच्या ढिगारे काढणे, साचलेल्या पाण्याच्या निचरा करण्याची व्यवस्था करणे, झुडपे साफ करणे, आदी कामे केली जात आहेत.
या अभियानाचे यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. बिजनकुमार शील, सह कार्यक्रमाधिकारी, डॉ. सुमेध वावरे, डॉ. संदीप सातव, डॉ. मृणाल वऱ्हाडे, डॉ. युवराज बोधे, डॉ. विवेक माणिक आणि डॉ. निलेश ठवकर हे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करत आहेत. तसेच रासेयो स्वयंसेवक, श्री. दिलराजसिंग अंधेरेले, श्री संदीप जीवतोडे, श्री. मुकेश भिमटे, श्री. वैभव बारेकर आणि कु. गौरी चंदनखेडे हे विद्यार्थी समूहाचे नेतृत्व करत आहेत.



