वंजारी खपाट येथे धरणगाव तालुका शासकीय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न !….

40

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगाव – धरणगाव येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा अधिकारी क्रीडा कार्यालय जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने धरणगाव शासकीय तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक विद्यालय बोरखेडा वंजारी खपाट ता.धरणगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी मोठ्या उत्साहाने कबड्डी स्पर्धा पार पडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे अध्यक्ष मा. जे पी शिरसाट उपस्थित होते. हातात मशाल ज्योत आणून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख उपस्थिती म्हणून धरणगाव तालुका गटशिक्षण अधिकारी डॉ. भावना भोसले मॅडम उपस्थित होते. तसेच वंजारी गावाचे सरपंच दादासो शंकर पाटील, गावाचे पोलीस पाटील गडबड दादा अहिरे शाळेचे मुख्याधापक बी जे पाटील सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एस आर पाटील सर यांनी केले.तसेच धरणगाव तालुका समन्वयक मा. सचिन सूर्यवंशी सर यांनी मुलांना प्रास्ताविकेतून मागदर्शन केले. धरणगाव तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक यांनी चांगल्या पद्धतीने साथ देऊन स्पर्धा पार पाडले. पंच म्हणून के एस पाटील सर, दिलीप गावित सर, शशिकांत पाटील सर, दीपक पाटील सर, बोरसे सर ,निलेश चौधरी सर, वि टी पाटील यांनी काम पाहिले तर सरदार वल्लभभाई पटेल शाळेचे क्रीडा शिक्षक राजेश पावरा सर तसेच त्यांचे सहकारी शिक्षक यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केले. स्पर्धेतील विजय संघांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या .