राजुरा शहरातील विविध समस्यांना घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पोलीस ठाणे व नगर परिषद ला निवेदन

69

 

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

राजुरा -शहरात तालुक्यातून दररोज असंख्य लोक विद्यार्थी कामानिमित्त व शिक्षण घेण्याकरिता येत असतात त्यामुळे सहाजिकच मोठी वर्दळ निर्माण होते.

शहरातून मोठ- मोठे ट्रक व इतर छोटी-मोठी वाहने सुद्धा ये- जा करीत असल्यामुळे तसेच शहरामध्ये वाहनांच्या गतीवर नियंत्रण नसल्यामुळे शाळा व महाविद्यालयीन वेळेवर शाळा सुटताना व भरताना अधिक गर्दी शहरात रस्त्यावर होत असल्याने ट्रैफिक सिग्नल सुरू करणे व शहरातील सी. सी. टी. व्ही कॅमेरे पूर्ववत सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे.

तसेच या वेळेत शहरातील श्री. शिवाजी महाविद्यालय जवळ, कर्नल चौक, पंचायत समिती संविधान चौक, बस स्थानक, बामणी टि पॉईंट, स्टेला मारिस स्कूल जवळ दररोज वाहतूक पोलीस तैनात असणे अतिशय आवश्यक आहे. तसेच केल्यास भविष्यात नक्कीच अपघात व इतर समस्या निर्माण होणार होणार नाही.

अश्या गंभीर मागण्यांना घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राजुरा तालुका अध्यक्ष आसिफ सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत राजुरा शहर अध्यक्ष कुणाल मोकड़े यांच्या वतीने राजुरा येथील ठाणेदार व नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

संबंधित अधिकार्‍यांनी ह्या समस्याना गांभीर्याने दखल घेत सर्व समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी यावेळी आश्वासन दिले.

या वेळी राजूरा तालुका अध्यक्ष आसिफ सय्यद यांच्या सोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रणय धोटे, शहर अध्यक्ष कुणाल मोकडे, तालुका उपाध्यक्ष दीपक मडावी, तालुका महासचिव साहिल शेख, प्रेम चुनारकर, अयान शेख, सूरज ब्राह्मने, रूपेश देवाळकर, तुषार येमूलवार व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.