विभागीय स्तरावर बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत स्टेला मेरिस विद्यार्थ्याची निवड

56

 

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

राजुरा (4 सप्टेंबर)-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर तर्फे आयोजित शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेचे बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत स्टेला मेरिस विद्यार्थ्याची विभागीय स्तरावर निवड करण्यात आलेली आहे. ही स्पर्धा चौदा वर्ष वयोगटात घेण्यात आली. त्यात इयत्ता आठवीतील रियांश सेनेग्राप व श्रीथन लक्काकुला यांनी विभागीय स्तरावर आपल्या अथक परिश्रमाने बुद्धिबळ स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष सिस्टर लुसी जोसेफ, शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सजिवा, स्टेट विभागाच्या मुख्याध्यापिका सिस्टर जोएल सिस्टर फ्रान्सिन तसेच क्रीडा शिक्षक भार्गवी कोडाली व भास्कर फरकडे यांनी तसेच सर्व शिक्षक व इतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले असून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.