सानवी मोरे हिची शालेय बुद्धिबळ स्पर्धेत विभाग स्तरावर निवड-जिल्ह्यातून द्वितीय स्थानावर

82

 

 

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

महर्षी उत्तम स्वामी महाराज कनिष्ठ महाविद्यालय चिंचोली (खुर्द) ची विजयी घोडदौड कायम.

राजुरा =४ सप्टेंबर)-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर तर्फे आयोजित शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेचे बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल येथे आयोजन करण्यात आले होते. महर्षी उत्तम स्वामी महाराज कनिष्ठ विद्यालय चिंचोली (खुर्द) येथील इयत्ता अकरावी मध्ये शिकणारी सानवी सचिन मोरे हिने १९ वर्षा खालील मुलींच्या संघातून चंद्रपूर जिल्ह्यात द्वितीय स्थान मिळवत तिची विभागस्तरावर बुद्धिबळ स्पर्धेकरीता निवड झालेली आहे. चित्रकलेची आवड असलेल्या सानवी मोरे ने क्रीडा स्पर्धेतही नावलौकिक प्राप्त केल्याने तिच्या आई – वडिलांसोबतच महाविद्यालयात आनंदाचे वातावरण पसरले आहे. सानवी विभाग स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक रूपेश सोळंके, क्रीडा शिक्षक रवींद्र गोरे, महेंद्र चौधरी तथा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या.