मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्यपदी आकाश सोरटे यांची निवड

88

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

 

म्हसवड (सातारा ) : – महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय कर्ज वितरण तक्रार निवारण समितीच्या पश्चिम महाराष्ट्रातील काही पदाधिकारी निवडी नुकत्याच सांगली जिल्ह्यातील बैठकीत करण्यात आल्या. यावेळी पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य म्हणून येवती तालुका कराड येथील आकाश रामचंद्र सोरटे यांची निवड करण्यात आली.

येवती तालुका कराड येथील आकाश रामचंद्र सोरटे यांनी गेले वीस वर्ष पत्रकारितेच्या माध्यमातून आणि चळवळीच्या माध्यमातून बहुजन समाजाचे न्याय हक्कासाठी समाजासाठी योगदान दिलेले आहे. त्यांच्या संघटन कौशल्य यामुळे सातारा जिल्ह्यातील बरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील काही गावांमध्ये त्यांचा नावलौकिक आहे. त्यांच्या आजवरच्या सामाजिक कार्यामुळे त्यांची पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य पदावर निवड करण्यात आली आहे.
सोरटे यांना निवडीचे पत्र समितीचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांच्या आदेशाने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पोपटराव भिसे यांनी दिली. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.