कळमना येथे आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन:१२८ रुग्णांची मोफत तपासणी.

82

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

राजुरा :– पर्यावरणपूरक, स्वच्छ-सुंदर आणि मार्डन स्मार्ट ग्राम म्हणून लौकिक मिळवलेल्या कळमना गावात ग्रामस्थांच्या आरोग्य सुरक्षा व जागरूकतेसाठी टाटा ट्रस्ट चंद्रपूर व उपकेंद्र पाढरपौणी यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते झाले.
कळमना ग्रामपंचायतीकडून नेहमीच जनकल्याणकारी व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. याच परंपरेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बोलताना सरपंच नंदकिशोर वाढई म्हणाले, मानवाच्या जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे निरोगी आरोग्य. या शिबिरातून ग्रामस्थांना आरोग्यसेवेचा लाभ मिळत असेल, तर हीच खरी मानवसेवा आहे. आणि मानवसेवा हीच ईश्वरसेवा आहे. त्यामुळे अशा सेवाभावी उपक्रमांतूनच खरा आनंद मिळतो.
शिबिरात तब्बल १२८ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. यामध्ये बीपी, शुगर तपासणी, ओरल कॅन्सर स्क्रिनिंग, गर्भाशय कॅन्सर स्क्रिनींग तपासणी तसेच ब्रेस्ट कॅन्सर तपासणीचा समावेश होता.
या शिबिरासाठी डॉ. साळुंखे (टाटा ट्रस्ट कॅन्सर हॉस्पिटल चंद्रपूर), डॉ. ट्विंकल ढेगळे, डॉ. नताशा, पांढरपौनी उपकेंद्राच्या सिस्टर किरण धांडे आदी मान्यवर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. तसेच ग्रामसेवक शुभांगी कवलकर, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ पिंपळशेंडे, सुनिता उमाटे, रंजना पिंगे, आशा सुपरवायझर गिर सावळे, वर्षा घोगरे आशा वर्कर पाढरपौनी, कल्पना क्षिरसागर आशा वर्कर कळमना विविध आशा वर्कर, उमेद अभियान व ग्रामसंघ कार्यकर्त्या यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला. याशिवाय गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक महादेव पाटील पिंगे, आनंदराव पाटील बोढाले, उध्दव पाटील आसवले यांच्यासह कळमना व परिसरातील नागरिक उपस्थित राहून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.