गंगाखेड येथे फिटनेस स्क्वेअर जिम मध्ये बेंच प्रेस स्पर्धा संपन्न

86

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.11सप्टेंबर):-मधील सुप्रसिद्ध फिटनेस स्क्वेअर जिम मध्ये बेंच प्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या या जिल्ह्यास्तरीय स्पर्धेत परभणी,गंगाखेड़ आणि परिसरातील सर्वच 100 पेक्षा जास्त इच्छुकांनी सहभाग घेतला . ही स्पर्धा तीन गटामध्ये पार पडली. ह्यामध्ये वजनानुसार ज्युनिअर, सिनियर आणि मास्टर्स असे गट होते. या स्पर्धेत ज्युनिअर गटामध्ये सोहेल मणियार फिटनेस स्क्वेअर जिम चा सदस्य याने ९० किलो वजन उचलून पहिले पारितोषिक पटकावले तर फिटनेस स्क्वेअर चाच सदस्य असलेल्या शोएब शेख याने ९५ किलो वजन उचलून सिनियर गटामध्ये पहिले पारितोषिक मिळवले आणि मास्टर्स गटात परभणी शहरातील तरुण सैय्यद नावेद याने तब्बल १३०किलो इतके वजन उचलून पहिले पारितोषिक पटकावले.

या स्पर्धेसाठी जिम चे संचालक ओंकार नंदकुमार भरड आणि अनिरुद्ध नंदकुमार भरड तसेच जिम मधील ट्रेनर राम वाणी व उत्कर्ष देशमुख यांनी ही स्पर्धा यशस्वी केली. तसेच या स्पर्धेसाठी गंगाखेड येथील आदित्य चौधरी , भगत सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.