रविवारी पुसद येथे पंचशील महाधम्मध्वज यात्रेचे आगमन

95

 

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी, पुसद (यवतमाळ), मो.78751 57855

 

पुसद – बी. टी. अक्ट १९४९ निरस्त करण्यासाठी बोधगया महाबोधी महाविहार मुक्त आंदोलनाचे मुख्य संयोजक पूज्य भन्ते विनाचार्य व इतर पूज्य भन्ते आणि मान्यवर यांचा जनसंवाद पंचशिल धम्म ध्वज यात्रा दीक्षाभूमी ते चैत्यभूमी यांचे पुसद येथे रविवारी १४ सप्टेंबर रोजी आगमन होणार आहे.

सदर यात्रा ही वसंतराव नाईक उद्यान काकडदाती येथून निघणार आहे. तेव्हा सर्व समाज बांधवांनी शुभ्र वस्त्र परिधान करून व हातात पंचशील धम्म ध्वज घेऊन सकाळी ठिक ९ वाजता वसंतराव नाईक उद्यान येथे उपस्थित राहावे. यात्रा उद्यान ते महात्मा ज्योतिबा फुले चौक, तीन पुतळा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेताजी सुभाष चंद्र बोस चौक, मार्गस्थ करीत डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महामानवास अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात होणार आहे.

पूज्य भिक्खु संघाच्या धम्म देशना नंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक विकासराजा व गायक सुभाष कोठारे आणि संच यांचा बुद्ध भीम गीताचा बहारदार कार्यक्रम होईल.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.