राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आयोजित… आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा एल्गार…

138

 

नाशिक — येथील गोल्फ क्लब मैदानाजवळ एक टोक ते शेवटचे टोक जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक इथपर्यंत निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आयोजित “महाविक्राळ आक्रोश मोर्चाच्या” माध्यमातून शेतकऱ्यांच्या एकतेची ताकद काय असते याचा अनुभव नाशिककरांनी घेतला.
शेतकरी – कष्टकरी यांच्या न्याय हक्कासाठी पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वात आज नाशिक शहरात अतिशय विक्राळ मोर्चा निघाला. यामध्ये आदिवासी बांधवांसह राज्यभरातील शेतकरी तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सहभागी झाले. बैलगाडी, ट्रॅक्टर यासह झेंडे, कटआउट्स, बॅनर यासोबतच मोर्चात सहभागी शेतकरी – कष्टकरी – पक्षाचे नेते – पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिलेल्या विविध घोषणांनी नाशिक शहर दणाणून निघाले. मोर्चा एवढा प्रचंड होता तरी मोर्चात सहभागी प्रत्येक व्यक्तीला स्वयंशिस्त होती. मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालय जवळ झाला. त्यात काही निवडक नेत्यांसह पवार साहेबांचं भाषण झालं. शेतकरी हवालदिल झाला आहे त्याची कर्जमाफी करून सातबारा कोरा केला पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे तसेच वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने ताबडतोब उपाययोजना केल्या पाहिजेत. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, सुप्रिया सुळे, राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड, सर्व फ्रंटल व सेलचे अध्यक्ष रोहीत पवार, सर्व खासदार, सर्व आमदार, राष्ट्रीय कार्यकारणी तसेच प्रदेश कार्यकारणी सदस्य, विभागीय सदस्य, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, सर्व फ्रंटल व सेलचे अध्यक्ष, पक्षाचे निष्ठावंत शिलेदार असलेले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांसह राज्यभरातील शेतकरी बांधव व भगिनी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. या ऐतिहासिक मोर्चात जळगाव जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, धरणगाव तालुक्याचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष हितेंद्र पाटील, सोनवदचे माजी सरपंच उज्वल पाटील, माजी युवती अध्यक्षा कल्पिता पाटील, उद्योजक एकनाथ पाटील, लक्ष्मी डिजिटलचे संचालक अमित शिंदे, कॉन्ट्रॅक्टर मोहीत पवार, शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, युवक उपाध्यक्ष प्रमोद पाटील उपस्थित होते.