

प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)
परभणी जिल्ह्यासह गंगाखेड तालुका व परिसरामध्ये रविवारपासून ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाल्याने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे प्रशासनाने बाधित क्षेत्राचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.(दिनांक 15 सप्टेंबर सोमवार) रोजी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांना मागनीचे निवेदन दिले आहे.
गंगाखेड तालुक्यातील माखनी मंडळातील ढेबेवाडी, कोद्री,माणकादेवी,डोंगरजवळा, डोंगरपिंपळा,डोंगरगाव,बडवणी, कातकरवाडी,अंतरवेली सेलमोहा या डोंगर भागात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस पडले नदी, ओढ्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेती पिकामध्ये शिरल्याने शेतकऱ्यांचे कापूस सोयाबीन मूग उडीद ज्वारी इत्यादी शेती पिके खरडून गेली आहेत तर कोद्री डोंगरपिंपळा बडवणी आदी गावामध्ये पुराचे पाणी शिरल्याने घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ढगफुटी सदृश्य बाधित क्षेत्राची पाहणी करून प्रशासनाने शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर मनोज मुरकुटे,लक्ष्मण मुंडे, बाबुराव घरजाळे,हनुमंत मुंडे,मारुती साळवे यांच्यासह आदी शेतकरी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत



