

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*
राजुरा- दरवर्षी वृक्षारोपण अभियान असते परंतु ते कार्य सोपस्कार म्हणून न करता माझी जबाबदारी
म्हणून संगोपन करणे महत्वाचे असून तरच पर्यावरण सुरक्षित राहील “असे प्रतिपादन उपविभागीय वन अधिकारी मंगेश गिरडकर यांनी केले.
हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र मोहिमेचा, मराठवाडा मुक्ती दिन निमित्याने वन परिक्षेत्र कार्यालय राजुरा च्या सौजण्याने जिल्हा परिषद माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शाळा राजुरा येथे प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य किशोर उईके होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय वन अधिकारी मंगेश गिरडकर, वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगडे, क्षेत्र सहायक संजय गरमडे, प्रकाश मत्ते आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय वन अधिकारी मंगेश गिरडकर यांनी जल, जंगल, जमीन यांचे पर्यावरण संरक्षणात असणारे महत्व याबद्दल महत्व विशद करताना वृक्षारोपवन सोबत त्याचे संगोपन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे असे मार्गदर्शन केले. त्यानंतर मान्यवरांचे हस्ते शाळेच्या परीसरात चिंच,वड, पिंपळ, कडूनिब, बिबा, सीताफळ इत्यादी झाडाची रोपाची लागवड करण्यात आले. शाळेतील हरित सेना आणि स्काउट गाईड विद्यार्थी, शिक्षकांनी सुद्धा वृक्षारोपण करून एक झाड एक व्यक्ती अशी दत्तक घेऊन संगोपन करण्याचा निर्धार केला.
कार्यक्रमाचे संचालन क्रीडा निदेशक संतोष कुंदोजवार यांनी केला तर शिक्षक संजय गोखरे यांनी आभार मानले.
कार्यक्रमात सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, राजुरा वनपरिक्षेत्राचे वनरक्षक पवन मंदुलवार, मारोती चापले, संदीप तोडासे, शिवाजी कामले, प्रियंका टेम्भेकर, अंकिता नेवारे,गीता चव्हाण, सर्व क्षेत्र सहायक, वनरक्षक, वनमजूर नरेश निखाडे, गंगाधर मोहितकार, भाऊराव लांडे, विजू आत्राम शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.



