इन्फंट च्या विद्यार्थ्यांची पंचायत समिती आणि मातोश्री वृद्धाश्रम ला भेट

207

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथील इयत्ता नववी व दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी पंचायत समिती राजुरा आणि इयत्ता आठवी व नवव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी मातोश्री वृद्धाश्रमाला शैक्षणिक भेट दिली.
पंचायत समिती राजुरा येथे विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतींची कामे, नगरपरिषदेचे कामे, आरोग्य विभाग, शेतीची माहिती, शाळा कशी चालते, विविध प्रकारच्या योजना तसेच अंगणवाडीची माहिती प्राप्त केली. या प्रसंगी गटविकास अधिकारी श्री भागवत रेजीवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री श्रीकांत बोबडे, गटशिक्षणाधिकारी मंगला तोडे, विस्तार अधिकारी शिक्षण विशाल शिंपी, विस्तार अधिकारी शिक्षण सचिन मालवी, विस्तार अधिकारी शिक्षण सावन चालखुरे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी गणेश आडे तसेच Resource person मुसा शेख, राकेश रामटेके, ज्योती गुरनुले, सूर्यकांत ढगे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षक रामकली शुक्ला, शोएब शेख, रितू संतुरे उपस्थित होते.
तर मातोश्री वृद्धाश्रम येथे विद्यार्थ्यांनी येथील माहिती घेतली तसेच विविध पुस्तकांचे, गुलाबाच्या रोपट्यांचे आणि फळांचे वाटप केले. वृद्धाश्रमातील आजी-आजोबांशी संवाद साधून विद्यार्थी भावुक झालेत त्यांचा आशीर्वाद घेतला. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनीही विद्यार्थ्यांच्या सहवासाने आनंद व्यक्त केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव झाली. यावेळी मुख्याध्यापिका मंजुषा अलोने तसेच शिक्षक उमेश लढी, संतोष सागर, सुधीर कलास्केवार, विद्या चौधरी, वर्षा बजाज, वैशाली धानोरकर, उमेश महाकुलकर सहभागी झाले होते.