

गंगाखेड- श्री संत जनाबाई शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गंगाखेड येथे 14 सप्टेबर हिंदी दिना निमित्त दि.15 सप्टेबर, 2025 रोजी महाविद्यालयातिल हिंदी विभागाच्या वतिने सामान्य ज्ञान परीक्षा- 2025 चे आयोजन करण्यात आले. या परीक्षेस वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातिल एकुन 377 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली व प्रत्यक्षात 317 विद्यार्थांनी परीक्षा दिली.
या परिक्षेतिल यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव दि .17 सप्टेबर, 2025 रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिनाचे औचित्य साधुन संस्थचे अध्यक्ष डॉ आत्माराम टेंगसे व सचिव एडव्होकेट संतोषजी मुंढे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते “हिंदी दिन” निमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तिपत्रकाचे अनावरन ही करण्यात आले.
सदरील परिक्षेत वरिष्ठ महाविद्यालयातुन प्रथम क्रमांक-बी.ए. द्वितीय वार्षाचा विद्यार्थी गिरी अभिषेक दिगंबर, द्वितीय क्रमांक- बी. ए. तृतीय वार्षाची विद्यार्थिनी भालेराव वैष्णवी माधव तर तृतीय क्रमांक- बी.ए.तृतीय वार्षाची विद्यार्थिनी दुधाटे सोनाली रामेश्वर हिने पटकावला . तर कनिष्ठ महाविद्यालयातुन प्रथम क्रमांक- अकरावी विज्ञान शाखेचा नागरगोजे अर्जुन राजेन्द्र, द्वितीय क्रमांक अनुक्रमे अढाव अविनाश दिगंबर (बारावी वाणिज्य) व लवांडे आरती रामेश्वर (अकरावी विज्ञान) यांनी तर तृतीय क्रमांक अनुक्रमे पिसाळ आश्विनी धनराज (अकरावी वाणिज्य) व सूर्यवंशी विजय ज्ञानोबा (बारावी विज्ञान) यांनी प्राप्त केला.
या परीक्षेच्या यशस्वीते साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी.एम.धुत, उप-प्राचार्य डॉ.चंद्रकांत सातपुते, हिंदी विभाग प्रमुख डॉ एम. डी. इंगोले, परीक्षा संयोजक प्रा. डॉ. निवृत्ती एस.भेंडेकर, सह-संयोजक प्रा. प्रताप शिसोदे व प्रा. सुहास देशमाने, परीक्षा संयोजन समितितील प्रा. डॉ.मुंजाजी चोरघडे, प्रा.विजय बेरळीकर, प्रा.डॉ.संजय कदम, प्रा. राजेश भालेराव, डॉ.विष्णू लटपटे , प्रा. चैतन्य पाळवदे तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ संतोष गायकवाड़, कार्यालय अधीक्षक-भारत हत्तीअंबिरे, प्रा. डॉ. महाविर हाके, डॉ. किर्तिकुमार मोरे, डॉ दयानंद उजळंबे, प्रा.गणेश सातपुते, प्रा.आशीष देशमुख, प्रा. डॉ.मठपती, प्रा.रेवनवार, डॉ.कोळपे व सर्व सहकारी आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.



