थैलीसीमिया सिकलसेल दोन दिवसीय कॉन्फ्रेन्स मध्ये एकनिष्ठा फाउंडेशनला राष्ट्रीय पुरस्कार

68

 

*दिनांक 18/08/2025*
खामगांव : येथील एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशननी घेतला सहभाग मध्य प्रदेश निमच येथे थैलीसीमिया दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे व तसेच रक्तदान जनजागृती आयोजन दिनांक 13 व 14 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. थैलीसीमियावर नियंत्रण कसे मिळवावे याच्यावर विभिन्न राज्यातून आलेल्या डॉक्टरांनी सामाजिक कार्यकर्ते सुरज यादव यांनी मार्गदशन केले. व तसेच रक्तदान जिवनदान थैलीसीमिया सिकलसेल जनजागृती पायदळ रैलीचे सुद्धा नियोजन करण्यात आले होते निमच शहरातील मेनरोड मार्केट लाईन मध्ये रैली भ्रमण करत टाऊन हॉल येथे रैलीचे समारोप करण्यात आले होते. गेल्या मागील 13 वर्षा पासून एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशन खामगांव यांनी दत्तक घेतलेले थैलीसीमिया सिकलसेल रुग्णांना नियमित वेळेवर रक्ताची सोय त्यांच्या संस्थे कडून रक्तदाते पूरविले जातात सुरज यादव हे करत असलेली निशुल्क रक्तसेवा कार्य याची दखल निमच मध्य प्रदेश येथे दोन दिवसीय राष्ट्रीय कार्य शाळेत दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी सुरज शिवमुरत यादव राष्ट्रीय पुरस्कार प्रमाणपत्र शिल्ड देऊन त्यांचा सत्कार सीआरपीएफ आईजी अरविंद जी दत्ता साहेब मध्य प्रदेश यांच्या अध्यक्षते खाली त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी विष्णु सेन कछावा, रक्त रोग विशेषज्ञ डॉ. दिनेश भुराणी, सत्येंद्रजी, विकास शुकला, राकेश खिची आदि उपस्थित होते या कार्यक्रमाला भारत देशातील प्रत्येक राज्यातील सेवाभावी संस्था सामाजिक कार्यकर्ते यांची असंख्य उपस्थिती होती. अशी माहिती मंतोष मिश्रा यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.