सिम्बायोसिस कॉलेज ऑफ नर्सिंग यांचा सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल पुणे येथे शालेय आरोग्य तपासणी व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न: डॉ. सोनोपंत जोशी

121

 

पुणे: सिम्बायोसिस कॉलेज ऑफ नर्सिंग, लवळे, पुणे यांनी सोमेश्वर फाऊंडेशनच्या सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल, पाषाण यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने, कल्याणासाठी शालेय आरोग्य कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात आरोग्याच्या विविध पैलूंवर वैद्यकीय तज्ञामार्फत चर्चा तसेच तपासणी करण्यात आली. सिम्बायोसिस कॉलेज ऑफ नर्सिंगचे संचालक डॉ. सोनोपंत जोशी यांनी संतुलित आहाराचे महत्त्व सांगितले. कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचे प्रमुख डॉ. जस्नीत कौर यांनी मादक द्रव्यांचे सेवन प्रतिबंध या विषयावर भाषण केले. डॉ. मंगेश जबडे, सहाय्यक प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांना दंत काळजीबद्दल मार्गदर्शन केले तर सहाय्यक प्राध्यापक डॉ. रंजना चव्हाण यांनी डोळ्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल चर्चा केली श्री. प्रतीक साळवे आणि श्रीमती प्राची जाधव व्याख्याते यांच्या उपस्थितीत पौष्टिक आहाराचे प्रदर्शन आणि पोस्टर सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. BSC नर्सिंग चे पहिल्या, दुसऱ्या , तिसऱ्या वर्षातील नर्सिंग विद्यार्थी ,MSC नर्सिंग विद्यार्थी आणि SMCW च्या सामुदायिक औषध विभागाच्या डॉ. रेश्मा पाटील ,डॉ. स्प्रूती चाटे यांनी या कार्यक्रमासाठी डॉ. आदित्य सर नेत्रचिकित्सक यांच्यासमवेत विद्यार्थ्यांसाठी नेत्रतपासणी शिबिर आयोजित केले होते. स्कूलचे मुख्याध्यापक श्रीमती स्वाती पवार आणि सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलच्या प्राध्यापक ,सदस्यांनी शालेय मुलांच्या फायद्यासाठी शिक्षण आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा एकत्रित करणाऱ्या या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक करत सिंबायोसिस स्कूल ऑफ नर्सिंगच्या कार्याचे आभार व्यक्त केले.