

*प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)*
गंगाखेड येथील कै सौ शेषाबाई सीताराम मुंढे महाविद्यालयात महिला दक्षता पथक, पोलीस स्टेशन गंगाखेड यांनी भेट दिली. महाविद्यालयातील मुलींच्या व महिलांच्या सुरक्षित्ते संदर्भात अडचणी जाणून घेतल्या. आणी सुरक्षितते संदर्भात जागरूक मार्गदर्शन केले. भविष्यात जर कांही सुरक्षितते बाबत अडचण निर्माण झाल्यास महिला पोलीस यांच्या व्यक्तिगत संपर्क क्रमांक दिलाअसून, महाविद्यालयातील अँटी रँगिंग समिती व महाविद्यालयातील विद्यार्थिनी समवेत चर्चा केली. तसेच कोणत्याही महिला तसेच विद्यार्थ्याला शारीरिक, मानसिक, भावनिक किंवा लैंगिक त्रास होईल, अशी कोणतीही कृती किंवा वर्तणूक होणार नाही याची याबाबत उप पोलीस निरीक्षक मा. रमेश लोखंडे साहेबांनी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयच्या वतीने उप पोलीस निरीक्षक मा. लोखंडे साहेब तसेच दक्षता समिती, पोलीस स्टेशन गंगाखेडचे यांचे आभार मानले. तसेच यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बालाजी ढाकणे, प्रा डॉ अशोक केंद्रे, प्रा डॉ राजीव आहेरकर व प्रा डॉ रेखा बने उपास्थित हिते.



