गो.वा. महाविद्यालयात रा.से.यो तर्फे साक्षरता दिन साजरा

60

 

संजय बागडे, नागभीड प्रतिनिधी, मो. 91689 86378

 

नागभीड- राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक साक्षरता दिन घेण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. मंगेश देवढगले यांनी साक्षरतेचे महत्व पटवून देतांना असे सांगितले की, साक्षरता हा एक मुलभूत मानवी हक्क असून, त्यामुळे व्यक्ती, समाज आणि देशाचा विकास होतो. लोकांना त्यांचे हक्क आणि कर्तव्ये कळतात, अंधश्रद्धा दूर होतात आणि एक न्याय्य सशक्त समाज निर्माण होतो.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व रा.से.यो. समन्वयक प्रा. डॉ. चंद्रशेखर हनवंते यांनी अध्यक्षीय संवाद साधतांना साक्षरता मूलभूत हक्क आणि विकास, सशक्तीकरण, सामाजिक जागृती, अंधश्रद्धा निर्मुलन, रोजगार आणि आर्थिक प्रगती, न्याय आणि समानता, जागतिक नागरिकत्व या विषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचलन दिपाली मेश्राम बि.ए. भाग 2, हिने केले व आभार प्रदर्शन स्नेहल ढोक हिने केले. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सिंग यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. प्रा. अश्विनी बोरकुटे व प्रा.डॉ. मेघराज कापगते यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला 61 रा.से.यो. स्वयंसेवक उपस्थित होते.