

संजय बागडे, नागभीड प्रतिनिधी, मो. 91689 86378
नागभीड : नागभीड तालुक्यातील कोटगांव येथे दिनांक १७/०९/२५ ला ग्राम पंचायत कोटगांव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत अभियानाची माहिती व कार्यशाळा विशेष ग्रामसभा आयोजित करून अभियानाची सुरवात करण्यात आली. जनजागृती करण्यासाठी गावातून प्रभातफेरी व भजन दिंडी काढण्यात आली सदर अभियान 17 सप्टेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या 100 दिवसाच्या कालावधीत राबवायचे आहे. यात 1. सुशासनयुक्त पंचायत 2. सक्षम पंचायत 3.जलसमृद्ध ,स्वच्छ व हरित गाव 4.योजनांचे अभिसरण 5.संस्था सक्षमीकरण 6.उपजिविकाविकास व सामाजिक न्याय 7.लोकसहभाग व श्रमदान या घटकानुसार सदर अभियान पूर्णवत्वास न्यायचा असल्याने आज विशेष ग्रामसभा व जनजागृती रॅली आयोजित करून अभियान सुरवात करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती येथील कक्ष अधिकारी मदनकर,
आरोग्य सेवक ढोबळे,करंबे मुख्याध्यापक जी प शाळा कोटगांव,यशवंत भेंडारकर सरपंच ग्राम पंचायत कोटगांव, आनंद मेश्राम पत्रकार तसेच सर्व सदस्य व पदाधिकारी,ग्राम संघ सर्व सभासद,अंगणवाडी सेविका, आशा ताई, गावातील महिला बचत गटाचे सर्व पदाधिकारी व सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामवासीय जनता उपस्थित होते.अभियानाचे प्रास्ताविक वैशाली ढोरे ग्रामसेवक यांनी केले. महसूल अधिकारी वृषाली दाचेवार यांनी पांदन रस्ते या विषयी माहिती दिली. तसेच सम्शान भूमी व दफन भूमी विषयावर चर्चा करण्यात आली. आरोग्य विभागाचे आरोग्य सेवक यांनी टी. बी., अनेमिया या विषयी माहिती दिली. आशा वर्कर यांनी शुद्ध पाणी पिण्याविषयी माहिती दिली. तसेच साथीचे रोगाविषयी माहिती दिली. कक्ष अधिकारी मदणकर यांनी शासनाच्या पुरस्कारविषयी माहिती दिली. ग्रामसेविका वैशाली ढोरे यांनी शासनाचे विविध उपक्रमाविषयी महिला सोबत हितगुज करून महिलांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आभार राहुल करंबे यांनी केले. ठीक १०. ०० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सदर अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण दाखविण्यात आले.



