गो. वा. महाविद्यालयात “रेड रिबन क्लब” ची स्थापना

72

 

 

संजय बागडे, नागभीड प्रतिनिधी, मो. 91689 86378

नागभीड – गो .वा. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, नागभीड येथील एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात एड्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी रेड रिबन क्लब ची औपचारिक स्थापना करण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय सिंग व प्रमुख मार्गदर्शक म्हणून व प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एड्स प्रतिबंध व नियंत्रण युनिटच्या समुपदेशक सीमा मेश्राम तसेच रा.से.यो. समन्वयक डॉ. चंद्रशेखर हनवंते, कार्यक्रमाधिकारी प्रा. मंगेश देवढगले, डॉ. मेघराज कापगते व प्रा. अश्विनी बोरकुटे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सीमा मेश्राम यांनी एड्स विषयी सखोल जनजागृतीपर माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंगेश देवढगले व आभार रा. से. यो. स्वयंसेवक सन्मय जक्कनवार यांनी मानले.