

जगदीश का. काशिकर, विशेष प्रतिनिधी मो. ९७६८४२५७५७.
कोल्हापूर – श्री दुर्गादेवीने महिषासुराच्या वधासाठी अवतार घेऊन ९ दिवस युद्ध करून त्याच्यासह संपूर्ण राक्षसांचा नायनाट केला. त्याचेच प्रतीक म्हणजे नवरात्र! आज कलियुगातही काही असुर विविध रूप धारण करून लोकांना त्रास देत आहेत. नवरात्रीच्या काळात अनेक धर्मांध युवक त्यांची खरी ओळख लपवून, खोटी हिंदु नावे सांगून गरब्याच्या कार्यक्रमांमध्ये प्रवेश करतात आणि भोळ्या-भाबड्या हिंदु युवतींना आपल्या प्रेमजालात अडकवतात. गरबा आणि दांडिया यांसारख्या हिंदूंच्या धार्मिक आयोजनांना ‘लव्ह जिहाद’चे माध्यम बनवले जात आहे. तरी उत्तरप्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांप्रमाणे कठोर ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ तात्काळ लागू करावा या मागणीसाठी निवेदनाच्या माध्यमातून अभियान राबवण्यात येणार आहे. त्याचा प्रारंभ म्हणून श्री महालक्ष्मीदेवी-आई अंबाबाईला २० सप्टेंबर या दिवशी साकडे घालण्यात आले. या अभियानाचा भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात १ लाख स्वाक्षरी घेऊन त्या मुख्यमंत्र्यांना देण्याचा निर्धार या प्रसंगी करण्यात आला. या प्रसंगी मंदिरात येणार्या भाविकांच्या निवेदनावर स्वाक्षरी घेण्यात आल्या.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे म्हणाल्या , ‘‘ ‘लव्ह जिहाद’ हे केवळ वैयक्तिक स्तरावरील गुन्हेगारी कृत्य नसून ते एक संघटित, नियोजनबद्ध आणि वैचारिक युद्ध आहे. यामध्ये खोटी ओळख, प्रेमजाळ, विवाह, धर्मांतरण, लैंगिक शोषण, वेश्या-व्यवसाय, निर्घृण हत्या, मानवतस्करी आणि विक्री, मानवी अवयवांची विक्री आणि दहशतवादी कारवायांत सहभाग इथपर्यंत गंभीर गुन्ह्यांचा समावेश होतो. तरी राज्यात तात्काळ कठोर ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ लागू करावा.’’
या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, हिंदू एकता आंदोलनाचे शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर आणि श्री. दिलीप भिवटे, सेवाव्रत प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. संभाजी(बंडा) साळुंखे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसंयोजक श्री. अशोक गुरव, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, मराठा तितुका मेळवावाचे श्री. योगेश केरकर, हिंदू महासभेचे श्री. प्रशांत पाटील, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. विजय चौगुले, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, विश्व हिंदु परिषेदेच्या वंदना बंबलवाड, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री. मधुकर नाझरे, कु. प्रतिभा तावरे, सौ. प्रीती पवार, हिंदुत्वनिष्ठ श्री. सचिन भोसले, श्री. कैलास जाधव(आबा) हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.



