गंगाखेड येथे गोदावरी नदीने ओलांडली धोक्याची पातळी

460

प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515) गंगाखेड येथील गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नादिकाटच्या गावांना प्रशांनाने सतर्कचा इशारा दिला असून गंगाखेड तालुक्यातील सावंगी,खळी, धारासुर, दुसलगांव, महातपुरी,भांबरवाडी,झोला, पिंपरी,मसाला, नागठाणा,सायळा, सुनेगाव,मुळी व धारखेड या गावांना धोका निर्माण झाला असून गंगाखेड शहरातील बरकत नगर येथील घरा मध्ये पाणी शिरले असून येथील रहिवाशी यांच्यावr संकट ओडले आहे. तसेच गंगाखेड ते धारखेड हा पूला वरून पाणी वाहत असल्या मुळे वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच बॅक वॉटर मुळे शेती मध्ये पाणी सचल्या ने शेतकऱ्या चे मोठे नुकसान होताना दिसत आहे तसेच उपविभागीय अधीकारी शिवराज डापकर यांनी बचाव पथके स्थापन करून पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाहणी केली असून नागरिकांनी नदी पात्रात न जाण्याचे आव्हान प्रशांनाने केले आहे.