चोपडा येथील ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थीनींचे वक्तृत्व स्पर्धेत उल्लेखनीय यश

58

 

पंचायत समिती शिक्षण विभाग चोपडा आणि हिंदी अध्यापक मंडळ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थीनींनी उल्लेखनीय यश संपादन केले. चोपडा येथील विवेकानंद माध्यमिक विद्यालयात या तालुकास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या दोन गटांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वृक्षाली विजय सोनवणे या इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनीने पाचवी ते सातवीच्या गटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. श्रावणी संतोष राठोड या विद्यार्थिनीने इयत्ता आठवी ते दहावीच्या गटात तृतीय क्रमांक प्राप्त केला. या विद्यार्थिनींना शाळेतील हिंदी विषयाच्या शिक्षिका जयश्री सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.
महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डाॅ. स्मिता पाटील, समन्वयक प्रा. डाॅ. डी. एस. पाटील, शाळेचे मुख्याध्यापक अरुण पाटील, उपमुख्याध्यापिका अश्विनी पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.