गुलाम नबी आझाद उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड आर्ट्स पुसद मध्ये शाळास्तरावर विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन.

91

 

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी, पुसद (यवतमाळ), मो.78751 57855

पुसद- गुलाम नबी आझाद उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पुसद मध्ये विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टीकोन आणि सर्जनशीलता,वैज्ञानिक नवनिर्मिती पाहण्यासाठी या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन मुख्याध्यापक संघटनेचे तालुका अध्यक्ष मुरलीधर बळीराम राठोड सरांच्या हस्ते करण्यात आले.तर प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप सारंग सर आणि वाघमारे सर हे पुसद बी.आर सी चे प्रतिनिधी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे संचलन सैय्यद सलमान सरांनी केले.प्रदर्शनीमध्ये एकूण 53 मॉडेल सह 83 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या कल्पकतेच्या आधारावर नवनवीन वैज्ञानिक प्रयोगाचे प्रदर्शन केले विशेष म्हणजे मुलांनी आजच्या आधुनिक काळातील समस्या व त्यावर वैज्ञानिक उपाय आपल्या मॉडेलद्वारे प्रस्तुत केले.या प्रदर्शनासाठी शाळेतील पर्यवेक्षिका फरहा दिबा मॅडम,तसेच सहाय्यक शिक्षक आतिफ रजा सर,मोहम्मद साकिब सर,सय्यदा जवेरीया मॅडम यांनी मोलाची भूमिका होती तसेच प्रदर्शनीसाठी ज्येष्ठ शिक्षक अब्दुल नईम सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.तसेच तारिक अहेमद सर,सैय्यद सलमान सर,सैय्यद नवेद सर,उमर फारुक सर,यांनी सुद्धा कार्यक्रमाच्या नियोजनात योग्य भूमिका बजावली.तसेच आलेल्या मान्यवरांनी सदर प्रदर्शनातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मॉडलचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या.या यशस्वी पार पडलेल्या विज्ञान प्रदर्शनीकरिता शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद सादिक शेख सरांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या.