भर पावसात भवानी मंदिरात गरबाप्रेमीचा दांडिया

61

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

राजुरा : शहरा लागून असलेल्या पुरातन भवानी मंदिर इथे मागील अठरा वर्षापासून जय भवानी गरबा उत्सव आयोजन समिती रामपूर राजुराच्या वतीने गरबा उत्सव आयोजित केला जातो. यामध्ये राजुरा शहरातील व परिसरातील गरबा प्रेमी मोठ्या उत्साहाणे सहभाग घेत असतात..

गरबा उत्साहात विरजन टाकले ते पाऊसाने, या वर्षी सतत मुसळधार पाऊस सुरु असल्याने गरबा प्रेमीचा हिरमोड झाला. असे असले तरी उत्साही गरबाप्रेमी आपला उत्साह भर पावसात कायम राखत दांडिया खेळून उत्सव साजरा करीत असल्याचे बघायला मिळत आहे.

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही भवानी गरबा उत्सव आयोजन समिती रामपूर राजुरा चा वतीने मोठ्या प्रमाणात गरबा प्रेमिसाठी दांडियाची तयारी केली आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून पावसाने जोर धरला असून दररोज पाऊस हजेरी लावत असल्याने गरबा प्रेमी सुद्धा भर पावसात रोज मोठ्या संकेने गरबा दांडिया खेळत आहे. आयोजकांनी मोठ्या प्रमाणात बक्षीसांचा पाऊस पाडल्याणे गरबाप्रेमी दररोज असलेल्या बक्षीसाना बघून भर पावसात दांडिया खेळत आहे.

दररोज प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक आणि प्रोत्साहन बक्षीस तसेच यावर्षी गरबा प्रेमी साठी व त्यांचा उत्साह वाढविणारे प्रेक्षक यांच्या साठी सुद्धा लक्की ड्रॉ हा उपक्रम राबविण्यात आला आहे. मान्यवरांच्या हस्ते गरबा प्रेमीना बक्षीस देऊन प्रोत्साहित करीत आहे. भक्ती व श्रद्धा ठेवून मोठ्या प्रमाणात भाविक मंदिरात येत असतात. याच दरबारात दांडियाचा आनंद भाविकांना घ्यायला मिळत आहे. भाविकांसाठी गरबा उत्सव समितीचे आयोजक अनिल चव्हाण, स्वप्निल सोळंके, अंकुश चव्हाण, राजू साईनवार, आशिष लोनगाडगे, राजू शेंडे, मयुर बोनगीरवार, अभिषेक गंपावार, मनीष विरूटकर, संदीप खोके,बंगाली दादा, मयुर बल्की, अमोल सोनेकर, प्रमोद सोनेकर,अरविंद साव, अनिश सिंगयांनी उत्तम व्यवस्था केली असून गरबा प्रेमीनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आव्हान केले आहे.