जिवाभावाच्या माणसांनी मी समृद्ध आहे : लक्ष्मणराव पाटील

141

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

आपण जन्माला आलो ह्या क्षणाची दरवर्षी आठवण करून देणारा दिवस म्हणजे वाढदिवस. दररोज अनेक व्यक्तींचे वाढदिवस साजरे होतात. काही लोकं पद – प्रतिष्ठा – पैसा – प्रसिद्धी यामुळे खूप मोठे असतात त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप कार्यक्रमांची रेलचेल असते. मी मात्र पदाने मोठा नाही, पैशाने समृद्ध नाही परंतु आपल्या जिवाभावाच्या माणसांनी फार समृद्ध आयुष्य जगतोय म्हणून मी शास्वत श्रीमंतीचा धनी आहे.
तीन दिवसांपूर्वी माझा वाढदिवस होता ज्या दिवसाच्या निमित्ताने मला सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कृषी, पुरोगामी चळवळ, पत्रकारिता, कला व क्रीडा, विधी व न्याय, वाणिज्य व व्यापार, मनोरंजन, विविध संस्था व संघटना इ. च्या माध्यमातून अनेकदा महनीय मान्यवरांनी, आप्टेष्ट, नातेवाईक, मित्र परिवारातील जिवाभावाच्याच्या मान्यवरांनी भरभरून प्रेम दिले. कॉल, मेसेज, व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम इ. सोशल मीडियावर ज्या सर्व जिवाभावाच्या लोकांनी सदिच्छा दिल्या त्यांना रिप्लाय द्यायला मला दोन दिवस लागले. आज मी त्यांच्यासाठी मी ही पोस्ट करतोय ज्यांनी मला प्रत्यक्ष शुभेच्छा देऊन खऱ्या अर्थाने समृद्ध केले.

*वाढदिवसाच्या दिवसाचा घटनाक्रम…*

🔹सकाळी ओम शांती केंद्रात आदरणीय नीता दीदींनी औक्षण केलं व सर्व दीदींनी शुभेच्छा दिल्यात तसेच लिटल ब्लॉझम स्कुल च्या विद्यार्थ्यांना व्यसन व भविष्यात निर्माण होणारे धोके याविषयी जनजागृती केली.

🔹नवजीवन विद्या विकास मंडळ नगाव (धुळे) संचलित दिव्यांग युनिट, वृद्धाश्रम, व्यसनमुक्ती केंद्रात संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब शशिकांत भदाणे यांच्यासमवेत औपचारिक कार्यक्रम व दुपारचे स्नेहभोजन घेतले.

🔹महात्मा फुले हायस्कुल येथे सत्यशोधक समाज संघाच्या सांस्कृतिक प्रबोधन शिबिरात ऍड सुरेश झाल्टे, मुकुंदभाऊ सपकाळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सर्व वैचारिक मित्र परिवाराच्या उपस्थितीत सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

🔹किस्मत मेन्स पार्लर जवळ अपंग महासंघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

🔹सर्वज्ञ इंडस्ट्रीज एमआयडीसी धरणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जेष्ठ श्रेष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून व पेढे भरवून तसेच अनमोल ग्रंथ, शाल, पुष्पगुच्छ देऊन माझा तसेच आमचे युवक अध्यक्ष परेश गुजर यांचा वाढदिवस साजरा झाला.

🔹रमेशभाऊ महाजन व सागरभाऊ महाले मित्र परिवाराच्या वतीने त्यांच्या दुकानाजवळ केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

🔹छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ आदरणीय गुलाबरावजी वाघ, निलेशभाऊ चौधरी तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सर्व मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन माझा आणि शिवसेना संघटक बापूदादा महाजन यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला.

🔹स्वराज्य टी हाऊस येथे सु.क्ष.म.स. अध्यक्ष व संचालक मंडळ, जनकल्याण पतसंस्था, स्वामी विवेकानंद पतसंस्था, भाजपाचे पदाधिकारी, बामसेफ व सहयोगी संघटनांचे प्रतिनिधी, सत्यशोधक समाज संघांचे पदाधिकारी, शैक्षणिक, कृषी, विधी व न्याय क्षेत्रातील नामवंत मान्यवर, साई स्पोर्ट्स क्लब तसेच जिवलग मित्र परिवार आदींनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात.

🔹रात्री घरी आल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य, आप्तेष्ट – नातेवाईक, मार्गदर्शक, गुरुजन, यांच्यासमवेत माझा वाढदिवस साजरा झाला. याप्रसंगी धरणगाव कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक जितेंद्र ओस्तवाल सरांचा देखील वाढदिवस साजरा करण्यात आला.

या सर्व सुखद अनुभवाने एकच समजलं की माणूस म्हणून मी जे सकारात्मक जीवन जगतोय ते निश्चितच शास्वत आणि वास्तववादी आहे. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एवढं प्रेम, सन्मान, आशीर्वाद मिळणं आणि आपल्या असण्याचा इतरांना आनंद होणं खरोखरच खूप खुखद अनुभव असतो.

लेखनप्रपंच
लक्ष्मणराव पाटील
शहराध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष धरणगाव