पुसेगाव मध्ये 8 किलो गांजा जप्त.

47

सातारा ,खटाव प्रतिनिधी: नितीन राजे. (9822800812)
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेगाव पोलीस स्टेशन हद्दीत.
विसापूर फाटा परिसरात दुचाकीवरून गांजा घेऊन जाताना पुसेगाव पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. संशयितांकडून ८ किलो २२० ग्रॅम गांजा व दुचाकी असा सुमारे ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या घटनेची नोंद पुसेगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.

विनोद गुलाब कदम (वय ३२, रा. पांढरवाडी, विसापूर, ता. खटाव), समाधान दिलीप खरात (२९, रा. मलवडी, ता. माण), बिधान सुनील दास (रा. दुधौरा, विहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या

माहितीनुसार, गुरुवार, दि. २५ सप्टेंबर रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास पुसेगाव पोलिसांनी विसापूर फाटा येथे नाकाबंदी केली होती. या दरम्यान पुसेगावकडे जाणाऱ्या दुचाकी (क्रमांक एमएच ११ डीएस ७८९३) वरून आलेल्या तिघांना थांबवले. चौकशीत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने बॅग तपासली. त्यावेळी त्यांच्या बॅगेत एकूण ८ किलो २२० ग्रॅम गांजा मिळाला. पोलिसांनी गांजा व दुचाकी असा एकूण साडेतीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईत सातारा पोलिस ठाण्याचे पोनि नीलेश तांबे, पुसेगाव पोलिस ठाण्याचे सपोनि संदीप पोमण व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभाग घेतला