

छिंदवाडा-देशातल्या पुरोगामी महापुरुषांच्या विचारांवर आधारित आणि पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ ही संघटना गेल्या आठ वर्षांत देशभर झपाट्याने विस्तारत आहे. महाराष्ट्रातून सुरू झालेली ही पत्रकार संघटना आता गुजरात, कर्नाटक, तेलंगणा आणि मध्यप्रदेश येथे सक्रिय आहे.
रविवार, दिनांक 28 सप्टेंबरला मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे संघाच्या प्रदेश कार्यालयाचे औपचारिक उद्घाटन संपन्न झाले. हा सोहळा संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अंडागळे, तसेच राष्ट्रीय स्तरावर संघाला विविध राज्यांमध्ये पोहोचवणारे राष्ट्रीय संघटक निलेश ठाकरे उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय प्रसिद्ध प्रमुख प्रीतमसिंग चौहान, राष्ट्रीय प्रवक्ता मारुती जाधव, राष्ट्रीय संपर्क प्रमुख श्रावण पाटील, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सागर खाबरागडे, विदर्भ अध्यक्ष मनोज मोडक, विदर्भ उपाध्यक्ष प्रणित भगत, तर मध्यप्रदेशातील उपस्थित मान्यवरांमध्ये मध्यप्रदेश अध्यक्ष प्रदीपकुमार जुलमे आणि छिंदवाडा येथील जेष्ठ हिंदी/मराठी चॅनल तसेच वृत्तपत्र पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी मध्यप्रदेश अध्यक्ष प्रदीपकुमार जुलमे यांनी सांगितले की, राज्यात 55 जिल्हे असून त्यापैकी 4 जिल्ह्यात संघाचे काम सुरु झाले आहे.



