

*प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)* दिनांक 30/09/2025 रोजी डॉ. चाटे दंत रोगतज्ञ गंगाखेड व राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कै. सौ. शेषाबाई सीताराम मुंढे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयच्या वतीने दंतरोग व दंतचिकित्सा शिबीरराचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी डॉ .योगेश चाटे यांनी १५५ मुले व मुलांची तपासणी करून योग्य ते मार्गदर्शन करतेवेळी असे सांगितले की, जागतिक स्तरावर मानवी शरीराला त्रासदायक ठरलेल्या दोन आरोग्यच्या समस्या म्हणजे एक मोबाईल अतिवापरामूळे डोळयांची समस्या व दूसरी म्हणजे दातांची समस्या आहे. तुमचे दात सुरक्षित तर तुमचे सर्व शरीर सुरक्षित तुमचे शरीर सुरक्षित तर तुमचे जीवन व भविष्य उज्वल होईल असे उदगार काढले .या शिबिरासाठी कार्यक्रमधिकारी डॉ. अशोक केंद्रे, डॉ. किरण पिनाटे , डॉ. लहू फड व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. प्राचार्य डॉ बालाजी ढाकणे व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष संचालक डॉ राजीव आहेरकर यांनी रा से यो विभाग व डॉ योगेश चाटे यांचे आभार मानले. कार्यक्रमांची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.



