सत्यशोधक रविंद्र पितांबर महाजन यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार !….

49

 

प्रतिनिधी – पी डी पाटील

एरंडोल – एरंडोल येथील सामाजिक कार्यकर्ते , एरंडोल मध्ये आदर्श शेती करणारे व सामाजिक कार्य करणारे तथा सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सत्यशोधक रवींद्र पितांबर महाजन यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे दि. २८ सप्टेंबर, २०२५ रविवार रोजी राजनंदनी बहुउद्देश संस्था जळगाव यांच्यातर्फे भैय्यासाहेब पाटील व डॉ.महेंद्र काबरा व मान्यवरांच्या हस्ते सत्यशोधक रवींद्र पितांबर महाजन यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अरविंद खैरनार, उपाध्यक्ष दत्ताजीराव जाधव ,सचिव डॉ. सुरेश झाल्टे तसेच जिल्हाध्यक्ष पी डी पाटील व जळगाव जिल्ह्यातील समस्त सत्यशोधकांनी रवींद्र महाजन यांचे अभिनंदन व कौतुक केले.